Voda-Idea ची ऑफर ! ‘रिचार्ज’ करा दुसर्‍यांचं ‘अकाऊंट’ आणि ‘कमवा’ पैसे

नवी दिल्लीः वृत्तसंस्था –  एअरटेल आणि जिओच्या पावलावर पाऊल टाकत आता व्होडाफोन आयडियाने नवीन # रिचार्ज फॉर गुड प्रोग्राम सुरू केले आहे. याअंतर्गत, ग्राहक दुसर्‍या प्रीपेड खात्यात रिचार्ज करून पैसे कमवू शकणार आहे. कंपनी हे पैसे कॅशबॅकच्या स्वरूपात देणार आहे.

व्होडाफोन आयडियाकडून विद्यमान ग्राहकांने जर दुसर्‍याच्या अकाऊंटला रिचार्ज केले तर त्याला 6 टक्क्यांपर्यंतचे कॅशबॅक ऑफर केले जाणार आहे. हे रिचार्ज मायव्होडाफोन किंवा मायआयडिया अ‍ॅपद्वारे करणे आवश्यक आहे. व्होडा-आयडियाद्वारे दिल्या जाणाऱ्या स्कीमच्या तुलनेत जास्त आहे.

किरकोळ विक्रेते आणि कंपनीची दुकाने बंद असताना व्होडाफोन आणि आयडियाची ऑफर कोरोना लॉकडाऊनच्या वेळी देण्यात आली आहेत. त्याचबरोबर दुकान बंद झाल्यामुळे ऑनलाइन मोडचा वापर न करणाऱ्या लोकांना रिचार्ज करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही ऑफर दिली आहे.

व्होडाफोन आयडियाची कॅशबॅक ऑफर आणि इतर कंपन्यांच्या अशाच योजना विद्यमान ग्राहकांना या कठीण काळात त्यांचे मित्र, कुटुंब, शेजारी आणि लोकांना मदत करण्यासाठी मोहित करतील.

व्होडाफोनकडून # रिचार्जफॉरगुड प्रोग्रामची जाहिरात मायव्होडाफोन अ‍ॅपमधील बॅनरद्वारे प्रमोट केली जात आहे. कॅशबॅक मिळविण्यासाठी, कंपनीच्या ग्राहकांना स्वतंत्रपणे नोंदणी करणे किंवा इतर कोणतेही अ‍ॅप स्थापित करण्याची आवश्यकता नाही. विद्यमान ग्राहकांना फक्त रिचार्ज करावे लागणार आहे आणि कॅशबॅकची रक्कम 96 तासात युजर्सच्या खात्यात पोहोचेल.

149 रुपयांच्या लोकप्रिय योजनेत ग्राहकांना 10 रुपये आणि 249 रुपयांच्या योजनेत 20 रुपये कॅशबॅक देण्यात येणार असल्याची माहिती व्होडाफोनने दिली आहे. व्होडाफोनकडून 6 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देण्यात येत असून रिचार्जच्या मूल्याच्या आधारे कॅशबॅक मिळेल.

हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, केवळ मायव्होडाफोन आणि मायआयडिया अ‍ॅपद्वारे रिचार्ज करावे लागेल. व्होडाफोनने म्हटले आहे की, ही ऑफर फक्त 30 एप्रिलसाठी जाहीर करण्यात आली आहे. अशाच योजना जिओ आणि एअरटेलने देखील जारी केल्या आहेत.