एअरटेल, जिओनंतर आता व्होडाफोन आणि आयडियाची बंपर ऑफर, ‘या’ प्लॅनवर ४००MB डाटा एकदम ‘फ्री’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवे प्लॅन बाजारात आणत आहेत किंवा जुन्या प्लॅनमध्ये बदल करून नवीन स्वरुपात ग्राहकांपुढे सादर करत आहेत. दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवताच जिओने मोठा धमाका केला होता.

सहा महिने मोफत सेवा देऊन त्यांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. मात्र जिओच्या प्रवेशामुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. त्यांना त्यांना देखील यामुळे आपल्या दरात कपात करावी लागली होती. त्यानंतर गेली ३ वर्ष जिओने आपल्या ग्राहकांना वेगवेगळी ऑफर देऊन बांधून ठेवले आहे.

त्यामुळे आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एअरटेल आणि बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणल्यानंतर आता वोडाफोन-आयडियाने देखील नवीन प्लॅन बाजारात आणले असून यामध्ये ग्राहकांना ४०० एमबी पर्यंत जास्त डेटा दिला जात आहे.

हि नवीन ऑफर वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना ४९९ आणि ३९९ च्या नवीन प्लॅनमध्ये दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला ४०० एमबी पर्यंत जास्त डेटा मिळणार आहे. यामुळे वोडाफोन-आयडियाने सरळ एयरटेलच्या प्लॅनला टक्कर देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता या ग्राहकांना दररोज १. ४ जीबी डेटा मिळणार आहे. आधी तो दिवसाला १ जीबी दिला जात असे. मात्र यासाठी तुम्हाला माय आयडिया रिचार्ज ऍप वरून रिचार्ज करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन रिचार्ज केल्यास देखील तुम्हाला याचा लाभ घेता येईल.

दरम्यान, सध्या वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना ४९९च्या प्लॅनमध्ये दिवसाला २ जीबी डेटा मिळत असे तो आता २. ४ जीबी मिळणार आहे. तसेच ३९९ च्या प्लॅनमध्ये पूर्वी १ जीबी मिळत असे आता १.४ जीबी मिळणार आहे.

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या