काय सांगता ! होय, ‘एकदम’ फ्री मिळणार दररोज 2GB डेटा अन् अनलिमिटेड ‘कॉलिंग’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी दररोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची ऑफर मार्केटमध्ये आणली आहे. विशेष म्हणजे कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता ही ऑफर कंपनीकडून ग्राहकांना दिली जात आहे. व्होडाफोन-आयडियाच्या या ऑफरची वैधता सात दिवस आहे. म्हणजे सात दिवसांपर्यंत ग्राहकांना दररोज मोफत 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. एकूण 14 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळणार आहे.

ऑफर पूर्णतः मोफत असून त्यासाठी तुमच्याकडे व्होडाफोन-आयडियाचा कोणताही अ‍ॅक्टिव्ह प्लॅन असणे आवश्यक आहे. मात्र, ही ऑफर कंपनीकडून काही निवडक ग्राहकांनाच दिली जात आहे. ट्विटरवर काही व्होडाफोन युजर्सनी 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग बेनिफिट्स मिळाल्याची माहिती शेअर केली आहे. व्होडाफोनच्या या ऑफरबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 121363 डायल करु शकता. जर, तुम्हाला ही ऑफर लागू होत तर त्याबाबत तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. जर, ऑफर लागू होणार नसेल तर व्हॉइस मेसेजद्वारे तसे सांगितले जाणार आहे.

यापूर्वी, व्होडाफोन-आयडियाने 299 रुपये, 449 रुपये आणि 699 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर डबल डेटा ऑफरचीही घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओही आपल्या काही निवडक ग्राहकांना चार दिवस मोफत 2 जीबी अतिरिक्त मोबाइल इंटरनेट डेटा देत असल्याचे उघड झाले होते.