‘Vodafone’ ची नवीन स्किम ! ‘या’ अटीवर फक्त 799 रूपयांमध्ये ‘4G स्मार्टफोन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता ग्राहक कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकतात. होम क्रेडिट इंडिया ही एक कंझ्युमर फायनान्स प्रोव्हाईडर कंपनी आहे. या भागिदारीनंतर आता दोन्ही कंपन्यांनी मिळून एक स्किम लाँच केली आहे. यानुसार ग्राहक आता 799 रुपये डाऊनपेमेंट करून स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यासोबतच ग्राहकांना 180 दिवसांचा अ‍ॅड ऑन बेनिफिटही मिळणार आहे.

स्मार्टफोनच्या किंमती 3999 पासून सुरू
होम क्रेडिटवर स्मार्टफोनची किंमत 3999 रुपयांपासून सुरू होते. ग्राहकांना इथे स्मार्टफोनची नवीन रेंज मिळणार आहे. नव्या स्किममध्ये ग्राहक कोणत्याही किंमतीचे 4G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

याशिवाय वोडाफोन-आयडिया ग्राहकांना कंपनी अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, 1.5 जीबी डेटा प्रतिदिन आणि प्रत्येक दिवशी 100 SMS फ्रीची सुविधा देणार आहे. या प्लॅनची सुविधा 180 दिवस ठेवण्यात आली आहे.

होम क्रेडिट 179 शहरांमध्ये 20,000 पॉईंट ऑफ सेलच्या PoS नेटवर्कद्वारे सेवा प्रदान करीत आहे. व्होडाफोन आयडिया म्हणते की, ग्राहक कंपनीच्या PoS केंद्रात जाऊन त्यांचा फोन सहजपणे अपग्रेड करू शकतात.

Visit : Policenama.com