‘या’ 90 दशलक्ष प्रीपेड ग्राहकांसाठी ‘व्होडाफोन-आयडिया’तर्फे 3 मे पर्यंत अनलिमीटेड इनकमिंग सेवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कमी उत्पन्न गटातील, फीचर फोन वापरणाऱ्या प्रीपेड ग्राहकांना सध्याच्या कठीण काळात कनेक्टेड राहाता यावे यासाठी व्होडाफोन आयडिया लिमिटेडने (व्हीआयएल) या वापरकर्त्यांसाठी 3 मे 2020 पर्यंत अमर्यादित इनकमिंग सेवा देण्याचे जाहीर केले आहे. या मोफत, विस्तारित इनकमिंग सेवेमुळे व्होडाफोन आणि आयडियाच्या लाखो ग्राहकांना त्यांच्या प्लॅनची वैधता आधीच संपली असली, तरी इनकमिंग कॉल्स येत राहातील.

येत्या काही दिवसांत सर्व पात्र ग्राहकांना शक्य तितक्या वेगाने इनकमिंग सेवेची वाढीव मुदत दिली जाणार आहे. कमी उत्पन्न गटातील, फीचर फोन वापरणाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना आता त्यांच्या प्रियजनांच्या संपर्कात राहाता येतील, स्थानिक प्रशासनाकडून ताज्या घडामोडी व बातम्याही जाणून घेता येतील.

व्होडाफोन आयडियाचे विपणन संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना सध्याच्या कठीण काळात कोणत्याही अडथळ्याशिवाय सतत कनेक्टेड राहाता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्याच्या विस्तारित लॉक डाउनमध्ये ग्राहकांना कनेक्टेड राहाता यावे यासाठी आम्ही 90 दशलक्ष ग्राहकांसाठी इनकमिंग सेवेची मुदत 3 मे 2020 पर्यंत वाढवली आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्याही अडळ्याशिवाय सर्व इनकमिंग कॉल्स स्वीकारता येणार आहेत.’

व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना पुढील विविध पर्याय वापरून आपले अकाउंट रिचार्ज करता येईल

– अप्स – मायव्होडाफोन अप, मायआयडिया अप

– संकेतस्थळ – www.vodafone.in, www.ideacellular.com

– ई- वॉलेट्स – पेटीएम, गुगल पे, फोन पे, अमेझॉन पे इत्यादी

– बँक एटीएम्स इत्यादी

व्होडाफोन आयडिया लिमिटेडबद्दल
व्होडाफोन आयडिया ही आदित्य बिर्ला समूह आणि व्होडाफोन समूहाची भागिदारी आहे. ही भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी आहे. कंपनी पॅन भारताला टुजी, थ्रीजी आणि 4जी प्लॅटफॉर्मद्वारे व्हॉइस आणि डेटा सेवा पुरवते. डेटा आणि व्हॉइसच्या वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी मोठ्या स्पेक्ट्रमची सोय करण्यात आली असून कंपनी ग्राहकांचा चांगली सेवा देण्यासाठी आणि लाखो नागरिकांना अधिक चांगले भविष्य घडवण्यासाठी मदत करून खऱ्या अर्थाने ‘डिजिटल इंडिया’ला योगदान देण्यासाठी बांधील आहे. कंपनी नवे आणि जास्त स्मार्ट तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी पायाभूस सुविधा विकसित करत असून त्याद्वारे रिटेल आणि व्यावसायिक ग्राहकांना नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी तयार करत आहे., जे डिजिटल चॅनेल्सच्या यंत्रणेद्वारे तसेच प्रत्यक्ष अस्तित्वाद्वारे सहज उपलब्ध असेल. कंपनीची राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजारात (बीएसई) नोंदणी झालेली आहे.