Vodafone-Idea ला मोठा धक्का ! भारतात ‘या’ ठिकाणी बंद करणार 3G सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया (Vi) दिल्लीत 15 जानेवारी पासून आपली 3G सेवा बंद करणार आहे. या बदलामुळे वोडाफोन आणि आयडियाने आपल्या ग्राहकांना आपले सिम कार्ड 4G मध्ये अपग्रेड करुन घेण्यास सांगितले आहे. कंपनीने उचलेलं हे पाऊन म्हणजे स्पेक्ट्रम रि-फार्मिंगचा एक भाग आहे. स्पेक्ट्रम रि-फार्मिंग अंतर्गत ऑपरेटर 4G सेवांसाठी आपल्या 3G स्पेक्ट्रमचा वापर करत आहे. बंगळुरू आणि मुंबईत हे आधीपासून सुरु झालं आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या वोडाफोन-आयडिया ग्राहकांना आपल्या जवळच्या स्टोअर्समधून 3G सिमला 4G मध्ये अपग्रेड करावं लागेल.

एका रिपोर्टनुसार, याबाबत माहिती देण्यासाठी Vi ने दिल्ली सर्कलमधील ग्राहकांना SMS पाठवण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी आपले जुने सिम कार्ड 15 जानेवारी 2021 पुर्वी 4G मध्ये अपग्रेड करावं असा मेसेज पाठवण्यात येत आहे. जे ग्राहक आपलं सिम 4G मध्ये अपग्रेड करु शकणार नाहीत, त्या ग्राहकांना Vi 2G द्वारे केवळ व्हॉइस कॉलिंग सुविधा देणं सुरु ठेवणार आहे. मात्र, वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना आपल्या फोनवर डेटा आणि व्हॉइस सेवा सुरु ठेवायच्या असल्यास, त्यांना 3G सिम 4G मध्ये अपग्रेड करावे लागणार आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दिलेल्या आकडेवारीनुसार, दिल्ली सर्कलमध्ये VI चे 16.21 मिलीयन पेक्षा जास्त ग्राहक आहेत. बंगळुरू आणि मुंबईत हे आधीपासून सुरु झालं आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, स्पेक्ट्रम रिफॉर्मिंगमुळे याठिकाणी 4G चा स्पीड वाढेल. 2100 मेगाहर्टस 5G नेटवर्कसाठी वापरला जात असताना कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, Vi मुंबईत आपली 2G सेवा सुरु ठेवणार आहे.