Vodafone Idea नं ‘या’ ग्राहकांसाठी केली फ्री रिचार्जची घोषणा, जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  व्होडाफोन आयडियाने म्हटले आहे की, भारतातील 60 मिलियन लो इन्कम यूजर्सलस फ्री रिचार्ज दिले जाईल. ही ऑफर एकावेळ आहे आणि ती कंपनीने कोरोना व्हायरस महामारी पहाता सुरू केली आहे.

व्होडाफोन आयडियाने म्हटले की, कंपनी कमी इन्कम ग्रुप यूजर्ससाठी वन टाइम फ्री रिचार्जचा ऑपशन देत आहे. या अंतर्गत 50 आणि 79 रुपयांचे पॅक्स दिले जातील.

49 रुपयांच्या पॅकमध्ये 38 रुपयांचा टॉकटाइम मिळेल आणि 100एमबी डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल. दुसरा पॅक म्हणजे आरसी 79 ही कॉम्बो ऑफर आहे. या अंतर्गत यूजर्सना 128 रुपयांचा डबल टॉक टाईम दिला जाईल आणि 200एमबी डेटा मिळेल. याची सुद्धा व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.

व्होडाफोन आयडियाच्या अगोदर एयरटेल आणि रिलायन्स जियोने सुद्धा भारतातील लो इन्कम ग्रुप यूजर्ससाठी अशाप्रकारचा प्लॅन लाँच केला आहे, जियोच्या प्लॅनमध्ये जियो फोन यूजर्सला अ‍ॅडिशनल टॉक टाइम देण्यात आला.

भारती एयरटेल कंपनीने 49 रुपयांचा पॅक फ्री केला. कंपनीनुसार ही ऑफर 55 मिलियन कमी इन्कमवाल्या ग्रुपसाठी आहे. या पॅक अंतर्गत 38 रुपयांचा टॉक टाइम आणि 100एमबी डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी सुद्धा 28 दिवसांची आहे.

मागच्या वर्षी सुद्धा या कंपन्यांनी लो इन्कम यूजर्ससाठी 10 रुपयांचे फ्री रिचार्ज दिले होते.