Vodafone Idea | वोडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका ! दोन रिचार्ज प्लॅन मधून काढले Disney+Hotstar बेनिफिट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vodafone Idea | एयरटेल, (Airtel) जियो (Jio) आणि वोडाफोन-आइडिया (Vodafone Idea) च्या आयात किमतीत वाढ झाल्यामुळे रिचार्ज प्लॅनचे बेनिफिटस हि कमी झाले आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी (telecom company) त्यांचे डेटा बेनिफिट कमी करण्यासोबतच त्यांचे स्ट्रीमिंग बेनिफिटसही कमी केले आहेत. टॅरिफ वाढल्यानंतर, Airtel आणि Jio ने त्यांच्या काही प्लॅनमधून Disney + Hotstar बेनिफिट काढून टाकले आहेत आणि ते दुसऱ्या प्लानमध्ये जोडले आहेत. Vodafone Idea ही लेटेस्ट कंपनी आहे, जिने त्याच्या दोन प्रीपेड प्लॅनमधून Disney + Hotstar बेनिफिट्स काढून टाकले आहे.
कंपनीने Rs 601 आणि Rs 701 च्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमधून Disney Plus Hotstar चे बेनिफिट्स काढून टाकले आहेत. कंपनीच्या 601 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 75GB डेटा देण्यात आला आहे, ज्याची 56 दिवसांची वैधता आहे.यामध्ये Disney+ Hotstar चा फायदा होता. दुसरीकडे, त्याच्या 701 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे आणि त्याची वैधता 56 दिवस आहे.
यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS चा फायदा दररोज मिळतो.
आता Vodafone Idea त्याच्या Rs 501 आणि Rs 901 च्या प्लॅनसह Disney Plus Hotstarचे बेनिफिट्स देत आहे.
501 रुपयांमध्ये 28 दिवसांची आणि 901 रुपयांमध्ये 70 दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
501 आणि 901 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS मिळतो.
या दोन्ही योजना Disney + Hotstar सह येतात. Vi ला त्याच्या 3055 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये Disney Plus Hotstar चा बेनिफिट्स देखील मिळतो.
या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची बेनिफिट्स दिले जाते.
Web Title :- Vodafone Idea | vodafone idea vi removed disney plus hotstar benefits from two of its prepaid plans get unlimited free calling and 3gb daily
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update