Vodafone-Idea चा खास प्लॅन ! केवळ 1 रुपया अधिक द्या अन् मिळवा फ्री कॉलिंगसह जास्त 24 GB Data

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक प्रसिद्ध आणि नामाकिंत कंपनी असलेल्या Vodafone-Idea हे आपल्या ग्राहकांसाठी काही Prepaid योजना आखत असते. वापरकर्त्यांसाठी आपल्या आवडीनुसार एखाद्या उत्तम योजनांची (offer) निवड करण्यासाठी कंपनी नेहमीच काही प्लॅन ऑफर करत असते. विविध प्लॅन असताना कुठल्या प्लॅनची निवड करावी यामध्ये प्रश्न पडतो. तर एका नव्या प्लॅननुसार केवळ १ रुपयाचा फरक आहे मात्र सेवा ह्या निराळ्या आहे. अशा प्लॅनसबंधी ज्यामध्ये १ रुपया अधिक देऊन 24 GB data अधिक मिळणार आहे.

असा मिळणार अतिरिक्त Data –
Vodafone-Idea युजर्ससाठी २१८ रुपये आणि २१९ रुपयाचे २ प्लान ऑफर आहे. तर या दोन्ही योजना साधारण सेम आहेत. यामध्ये २८ दिवसांची वैधता आणि Free calling मिळणार आहे. तसेच या प्लानमध्ये केवळ Data फरक आहे. २१८ रुपयांमध्ये केवळ 6 GB data तर २१९ रुपयांमध्ये डेली 1 GB data मिळणार आहे. अर्थात १ रुपया जादा दिल्याने तुम्हाला 24 GB extra data मिळणार आहे.

काय आहे २१८ रुपयाचा प्लान?
Vodafone-Idea चा २१८ रुपयांच्या प्लानमध्ये मर्यादीत data आहे. तर २८ दिवसाची वैधता तसेच यांमध्ये 6 GB data दिला जातो. या प्लानमध्ये कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. तर या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS दिले जाते. याव्यतिरिक्त यूजर्सना Vodafone-Idea Movies & TV Basic चे अॅक्सेस देखील दिले जात आहे.

काय आहे २१९ रुपयांचा प्लान?
Vodafone-Idea चा २१९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता, तर डेली 1 GB data आणि 2 GB extra data याप्रमाणे यामध्ये एकूण 30 GB data होतो. प्लानमध्ये सर्व Unlimited calling आणि डेली 100 SMS दिले जाते. तसेच याव्यतिरिक्त यूजर्सना Vodafone-Idea Movies & TV Basic चे अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहेत.