Vodafone नं लॉन्च केला नवीन प्रीपेड प्लॅन, मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5GB डाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वोडाफोन सतत नवीन प्रीपेड प्लॅन सुरू करून देशात आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करीत आहे. यासह, कंपनी अन्य कंपन्यांसोबत स्पर्धेदरम्यान विद्यमान योजनेत बदलत करत राहते. कंपनीने अलीकडेच 99 आणि 555 रुपयांचे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले. आता वोडाफोनने 997 रुपयांची नवीन दीर्घकालीन योजनादेखील सुरू केली आहे. टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार सध्या वोडाफोनची ही नवीन योजना केवळ निवडक सर्कलमध्येच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, कंपनी लवकरच ही योजना अन्य सर्कलमध्येही उपलब्ध करुन देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वोडाफोनचा 997 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन :
कंपनीचा हा एक दीर्घकालीन प्लॅन आहे. या योजनेत ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच 180 दिवसांच्या वैधते दरम्यान ग्राहकांना एकूण 270 जीबी डेटा मिळेल. या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ देखील मिळणार आहे. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंगचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय 997 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना वोडाफोन प्ले सबस्क्रिप्शनचा लाभही मिळेल. या माध्यमातून ग्राहक 999 रुपयांचा ZEE प्रीमियम कंटेंट एक्सेस करू शकता.

दरम्यान, कंपनीचा हा नवीन प्लॅन विद्यमान 1,499 आणि 599 रुपयांच्या प्लॅनदरम्यान उपलब्ध करून दिला जाईल. वोडाफोनच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 महिन्यांच्या संपूर्ण वैधतेमध्ये 2 GB जीबी डेटा देण्यात आला आहे, तर 599 रुपयांच्या योजनेत 84 दिवसांच्या वैधतेत दररोज 1.5GB जीबी डेटा देण्यात आला आहे. उर्वरित फायदे हे 997 रुपयांच्या योजनेसारखेच आहेत.

कंपनीने अलीकडेच 99 आणि 555 रुपयांच्या योजना देखील लाँच केल्या आहेत. वोडाफोनची 99 रुपयांची योजना 18 दिवसांच्या वैधतेसह आली आहे. या योजनेत, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा दिले जाते. यासह, या योजनेच्या संपूर्ण वैधते दरम्यान 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, ग्राहकांना या योजनेत व्होडाफोन प्ले आणि ZEE5 सब्क्रिप्शन एक्सेस देखील आहे.

तसेच 555 रुपयांचा प्लॅन 71 दिवसांच्या वैधतेसह लाँच केला गेला आहे. या योजनेत ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. याव्यतिरिक्त, ग्राहक देखील या योजनेद्वारे अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेण्यास सक्षम असतील. तसेच या योजनेत ग्राहकांना वोडाफोन प्ले आणि ZEE5 ची सदस्यताही मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/