खुशखबर ! ‘या’ कंपनीचा ‘स्वस्तात’ मस्त ‘प्लॅन’ ! फक्त 60 रुपयांत दररोज 1 GB डाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात टेलिकॉम क्षेत्रात सध्या अत्यंत स्पर्धा रंगली आहे. अनेक कंपन्या रोज आपले नवनवे स्वस्तातील प्लॅन लॉन्च करत आहे. असाच एक स्वस्तात जास्त डाटा देणारा प्लॅन वोडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे, ज्याची किंमत फक्त 59 रुपये आहे. या प्लॅनमुळे जिओच्या 52 रुपयांच्या प्लॅनला टक्कर मिळेल.

वोडाफोनचा 59 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांला 1 जीबी डाटा दिवसाला मिळतो आणि त्याची वैधता 7 दिवस असेल. ग्राहकांना एकून 7 जीबी डाटा उपलब्ध होईल. परंतू यात अनलिमिडेट कॉल आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही. या आधी वोडाफोनने एक फिल्मी प्लॅन लॉन्च केला होता ज्याची किंमत 16 रुपये होती. त्यात 1 दिवसासाठी 1 जीबी डेटा मिळत होता.

जिओचा 52 रुपयांचा प्लॅन –
यात ग्राहकांना 150 एमबी डाटा प्रतिदिवस मिळतो, या अनलिमिडेट कॉल आणि एसएमएसची सेवा मिळते, याची वैधता 7 दिवस असते.

दोन प्लॅनमधील फरक –
जिओपेक्षा वोडाफोन जास्त इंटरनेट डाटा जास्त आहे. जिओच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि मेसेज आहे. जिओ अ‍ॅपचे सब्सक्रिपशन यात मिळते. जर तुम्हाला जास्त मोबाईल डेटा हवा असेल तर तुम्हाला वोडाफोनचा 59 रुपयांच्या प्लॅन योग्य ठरेल.

 

Loading...
You might also like