70 दिवसांच्या वैधतेसह Vodafone चा नवीन ‘प्रीपेड’ प्लॅन लॉन्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्होडाफोनने 499 रुपयांची नवीन प्रीपेड योजना बाजारात आणली आहे. 70 दिवसांची वैधता असलेला हा प्लॅन सुरु झाल्याने कंपनीने सध्याच्या 555 रुपयांच्या प्रीपेड योजनेची वैधताही 77 दिवसांपर्यंत वाढविली आहे. दरम्यान, व्होडाफोनच्या 555 रुपयांच्या योजनेत पहिल्यांदा 70 दिवसांची वैधता देण्यात आली होती आणि 499 रुपयांच्या योजनेप्रमाणेच या योजनेतही फायदे उपलब्ध झाले होते. ही नवीन प्रीपेड योजना व्होडाफोन आणि आयडिया दोन्ही ग्राहकांसाठी बाजारात आणली गेली आहे. दरम्यान, सुरुवातीला ही योजना काही निवडक क्षेत्रातच सुरु होणार आहे.

व्होडाफोन वेबसाइटच्या यादीनुसार 499 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना 70 दिवसांच्या वैधते दरम्यान दररोज अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि 1.5 जीबीचा हाय स्पीड डेटा मिळेल. याव्यतिरिक्त, या योजनेत दररोज 100 स्थानिक आणि राष्ट्रीय एसएमएस देखील दिले जातील. तसेच ही प्रीपेड योजना सुरुवातीच्या काळात निवडक क्षेत्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची नावे समाविष्ट आहेत. तसेच ही योजना आयडिया नेटवर्क ग्राहकांनाही उपलब्ध आहे.

499 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज योजनेप्रमाणे व्होडाफोनने 555 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बदलला आहे, सध्या निवडक क्षेत्रात मर्यादित आहेत. म्हणजेच क्षेत्रांत अद्याप या योजनेची 70 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच, 555 रुपयांची बदललेली प्रीपेड योजना आयडिया नेटवर्क ग्राहकांसाठीही उपलब्ध असेल. DreamDTH ने सर्वात आधी नवीन प्रीपेड प्लॅनला स्पॉट केले आहे.