Vodafone नं लॉन्च केले 3 नवीन ‘प्रीपेड’ प्लॅन, कॉलर ट्यून सोबत 90 दिवसांची ‘वैधता’

पोलिसनामा ऑनलाईन – वोडाफोनने आपल्या व्हॅल्यू ऍडेड सर्विसेस सेगमेंटमध्ये तीन नवीन प्लॅन जोडले असून त्यांची किंमत ४७ रुपये, ६७ आणि ७८ रुपये आहे. हे प्लॅन कॉलर ट्यून आणि सेवा वैधतेचा लाभ देतात. हे तीन वोडाफोन व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस पॅक कोणतेही डेटा किंवा टॉकटाइम फायदे प्रदान करत नाहीत, कारण ते व्होडाफोन ऑल-राऊंडर पॅकचा भाग नाहीत. वोडाफोनच्या ६७ रुपयांच्या पॅकची मुदत ९० दिवसांची आहे, तर ४७ रुपयांचा प्लॅन हा एक VAS पॅक आहे, जो केवळ २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. हे तीन नवीन वोडाफोन व्हीएएस प्लॅन केवळ मुंबई सर्कलमध्ये पाहिले आहेत.
Vodafone ने लॉन्च किए तीन नए प्रीपेड प्लान, कॉलर ट्यून के साथ 90 दिनों तक की वैधता

Vodafone ने व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस सेगमेंटमध्ये तीन नवीन पॅक सादर केले आहेत आणि ते कंपनीच्या वेबसाईटवर आणि मुंबई सर्कलच्या ग्राहकांसाठी ऍपवर पाहिले जाऊ शकते. ४७ रुपयांच्या प्रीपेड योजनेत ग्राहकांना कॉलर ट्यूनचा लाभ मिळतो आणि गाणी अमर्यादित वेळा बदलू शकतात. ही योजना २८ दिवसांच्या वैधतेसह येते. ६७ रुपये व्हीएएस योजनेत ४७ रुपये इतकेच फायदे आहेत पण ती २८ दिवसांऐवजी ९० दिवसांच्या वैधतेसह येते.

आश्चर्य म्हणजे Vodafone ७८ रुपयांचा व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसे पॅकदेखील बाजारात आणला आहे, ज्यामुळे वरील दोन्ही पॅकमध्ये समान लाभ मिळतो. परंतु याची वैधता ६७ रुपयाच्या पॅकपेक्षा कमी ८९ दिवसांची आहे. वेबसाइटच्या म्हणण्यानुसारसुद्धा हा पॅक डेटा, टॉकटाइम किंवा इतर कोणत्याही प्रकारचा लाभ देत नाही. डेटा आणि अतिरिक्त टॉकटाइमसाठी वापरकर्त्यांना व्होडाफोनच्या इतर टॉप-अप आणि डेटा पॅकसह रीचार्ज करावे लागेल. हे तीन व्होडाफोन व्हीएएस पॅक TelecomTalk ने प्रथम पाहिले होते. अहवालात असे म्हटले आहे की, हे प्लॅन लवकरच इतर सर्कलमध्ये देखील आणले जाऊ शकतात.

कोरोनोव्हायरसविषयी जागरूकता वाढवण्यासाठी व्होडाफोनने अलीकडेच त्याचे नेटवर्क नाव देखील बदलले होते. कंपनीने नुकताच ऑल-राऊंडर ९५ रुपयांचा प्रीपेड पॅकही बाजारात आणला आहे, जो ७४ रुपयांचा टॉकटाईम आणि २०० एमबी डेटाचा फायदा देईल. या पॅकमधून रिचार्ज केल्यानंतर युजर्सला लोकल आणि नॅशनल कॉलसाठी प्रति सेकंद २.५ पैसे चार्ज द्यावा लागेल आणि या पॅकची वैधता ५६ दिवस आहे.