Jio आणि Airtel कंपनीला ‘टक्कर’ देण्यासाठी Vodafone चा ‘खास’ प्लॅन, 200 रुपयांत ‘हे’ सर्व फायदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जिओ आणि एअरटेल कंपनीला टक्कर देण्यासाठी आता वोडाफोन आणि आयडियानं युजर्ससाठी चांगला प्रीपेड प्लॅन पुन्हा एकदा लाँच केला आहे. हा प्लॅन कमी किमतीचा आणि ग्राहकांच्या खिशाला परवडणारा असल्यानं या प्लॅनला बजेट रिचार्ज प्लॅन असं नाव देण्यात आलं आहे. वोडाफोनच्या नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असल्यानं आणि रिचार्ज महाग असल्यानं अनेक ग्राहक जिओ आणि एअरटेलध्ये मोबाईल नंबर पोर्ट करताना दिसत होते. त्यामुळेच आता कंपनीने ग्राहकांना परवडणारा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये काय खास आहे हे जाणून घेऊयात.

199 Budget Recharge Plan
या प्लॅनमध्ये मिळतो ‘हा’ फायदा-
अनलिमिटेड कॉल्स
रोज 1 GB डेटा
रोज 100 SMS
वैधता 21 दिवस
एकूण डेटा 21 GB

कोणती सुविधा बेस्ट ? काय म्हणतात युजर्स ?
नेटवर्क आणि महागड्या रिचार्जमुळे वोडाफोन कंपनीच्या ग्राहकांमध्ये नाराजी दिसत आहे. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कंपनी आता स्वस्तातील प्लॅन लाँच करत आहे. कॉलिंग आणि इतर सुविधांसाठी वोडाफोन आयडिया बेस्ट असल्याचं युजर्स सांगतात. इंटरनेटचा विचार केला तर जिओची सुविधा चांगली आहे असंही युजर्स सांगतात.