वोडाफोनचा ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ प्लॅन, 255 रुपयात मिळवा 2.5 GB डाटा प्रतिदिवस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाजारात आपली स्थिती आधिक मजबूत करण्यासाठी वोडाफोनने आपला २५५ रुपयांचा धमाकेदार प्लॅन लॉन्च केला परंतू आता त्यात बदल केला असून यापुढे २.५ जीबी डाटा दर दिवसाला मिळणार आहे. वोडाफोनने याआधी २२९ रुपयांच्या प्लॅन लॉन्च केला होता त्यात दररोज २ जीबी डाटा देण्यात येत होता. याआधी २५५ रुपयांच्या या प्लॅनमध्ये प्रतिदिवस २ जीबी डाटा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येत होता.

एअरटेलला टक्कर देण्यासाठी वोडाफोनचा प्लॅन

कंपनीला २२९ रुपयांचा प्लॉन लॉन्च केल्यामुळे या २५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल करावा लागला. एअरटेलचा देखील २४९ रुपयांचा प्लॅन आहे, ज्यात २ जीबी डाटा प्रतिदिवसाला देण्यात येतो. याशिवाय कंपनीचा २९९ रुपयांचा प्लॅन आहे, ज्यात २.५ जीबी इंटरनेट डाटा देण्यात येतो. तसेच यात अ‍ॅमेझॉनची प्राइम मेंबरशिप देखील देण्यात येेते.

२.५ जीबी डाटा

या धकामेदार प्लॅनमध्ये वोडाफोन आपल्या ग्राहकांना रोज २.५ जीबी डाटा देणार आहे, तेही फक्त २५५ रुपयात. याआधी या प्लॅनमध्ये वोडाफोन प्रतिदिवस २ जीबी डाटा देण्यात येत होता. याशिवाय आता २५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, १०० मेसेज प्रतिदिवस मिळेल. या प्लॅनची वैधता २८ दिवस असणार आहे. या धमाकेदार प्लॅनमध्ये वोडाफोन प्ले सब्सक्रिप्शनचा देखील ग्राहक लाभ घेऊ शकतील. यामाध्यामतून ग्राहक लाइव्ह टीव्ही, सिनेमा आणि १०,००० पेक्षा आधिक शोजचा आनंद घेऊ शकतील.

आरोग्यविषयक वृत्त