Vodafone च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार पुर्वीपेक्षा अधिक ‘वैधते’ सह ‘अनलिमिटेड’ कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम सेक्टरमध्ये असे अनेक प्लॅन सुरु करण्यात आले आहेत ज्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा मिळवता येईल. याच अनुषंगाने वोडाफोन कंपनीने आपल्या प्रीपेड प्लॅनला रिवाइज केले आहे. त्याची किंमत 129 रुपये आहे. या प्लॅनचा कालावधी आधी 14 दिवसांचा होता आता हा कालावधी 24 दिवसांचा करण्यात आला आहे. कंपनीने जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनला टक्कर म्हणून हा प्लॅन सुरु केला आहे. मात्र वोडाफोनने हा प्लॅन केवळ आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मुंबई या भागासाठीच सुरु करण्यात आलेला आहे.

कसा आहे वोडाफोनचा 129 रुपयांचा प्लॅन
129 रुपयांच्या या प्लॅनची वैधता चौदा दिवसांची आहे मात्र वोडाफोनने हा प्लॅन आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मुंबईसाठी 24 दिवसांच्या मर्यादेसह सुरु केलेला आहे. राजस्थानमध्ये या प्लॅनची वैधता एकवीस दिवसांची आहे.लवकरच हा प्लॅन सर्वत्र 24 दिवसांसाठी लागू केला जाणार आहे. यामध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिले जाणार आहे. तसेच 300 SMS समवेत 2 जीबी डाटा दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त वोडाफोन प्ले ऍपचा ऍक्सिस देखील दिला जाणार आहे.

कसा आहे जीओचा 98 रुपयांचा प्लॅन
वैधता – 28 दिवस
कॉलिंग – जिओ टू जिओ अनलिमिटेड
एस. एम. एस – 300
इंटरनेट डेटा – 2 जीबी

जिओ अँपचे ऍक्सिस मिळणार आहे. या प्लॅनमध्ये इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी ग्राहकांना वेगळे रिचार्ज करावे लागणार आहे. दोनीही प्लॅनमध्ये कॉलिंगचा फरक मोठ्या प्रमाणावर आहे. जिओ केवळ जिओलाच अनलिमिटेड कॉलिंग देत आहे तर वोडाफोन कोणत्याही नेटवर्कची अनलिमिटेड कॉलिंग देत आहे.