वोडाफोनचा १२ महिन्यांचा सर्वात ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ प्लॅन, मिळणार ‘प्रतिदिवस’ १.५ GB डाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वोडाफोनने आपला वार्षिक प्लॅन अपडेट केला आहे. वोडाफोनने ३६५ दिवसांसाठी १,६९९ रुपयांचा प्लॅन आणला आहे. ज्यात आता १.५ जीबी डाटा मिळणार आहे आणि याशिवाय सर्व नेटवर्कवर ३६५ दिवसाचा अनलिमिटेडम कॉलिंग देखील देण्यात येणार आहे आणि यात रोज १०० एसएसएसची सुविधा देखील देण्यात येणार आहे. या आधी या प्लॅनमध्ये १ जीबी डाटा देण्यात येत होता.

या राज्यात प्लॅन लागू

वोडाफोन आपल्या प्लॅनमध्ये अपडेट करुन ५०० एमबी डाटा अतिरिक्त देणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस शिवाय प्लॅन वोडाफोन प्ले चा फ्री एक्सेस मिळणार आहे. वोडाफोनचा हा प्लॅन सध्या दिल्ली, गुजरात, हरियाणा, कोलकत्ता, महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई आणि उत्तर प्रदेश पूर्व साठी असणार आहे.

२०५ आणि २२५ रुपयांचा प्लॅन

वोडाफोनने सध्या दोन नवे प्री पेड प्लॅन सादर केला आहे. ज्यात २०५ रुपये आणि २२५ रुपयांचे प्लॅन सहभागी होते. वोडाफोनच्या या नव्या दोन प्लॅनमध्ये ४ जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस ची सुविधा मिळेल. वोडाफोनच्या २०५ रुपयात प्लॅनची वैधता ३५ दिवस केली आहे आणि प्लॅनमध्ये २ जीबी, ३ जीबी – ४ जी डाटा मिळेल. याशिवाय प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ६०० एसएमएस मिळेल. तसेच ग्राहकांना जी ५, वोडाफोन प्ले आणि मूवी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळेल.

२२५ रुपयाच्या प्लॅनमध्ये ४ जीबी डाटा मिळेल आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगबरोबर एकूण ६०० मिसेज मिळतील. या प्लॅनमध्ये वोडाफोन प्ले, जी ५ सारखे सब्सक्रिप्शन मिळेल. या प्लॅनच्या वैधतेता ४८ दिवस असेल. वोडाफोनचे हे दोन्ही प्लॅन बिहार – झारखंड, दिल्ली – एनसीआर, कर्नाटक आणि यूपी वेस्ट मध्ये उपलब्ध असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like