Jio Vs Vodafone : व्होडाफोनचा स्वस्तातील ‘मस्त’ प्लॅन, 1.5GB डेटासह अनलिमिटेड ‘कॉलिंग’ फ्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिचार्ज पासून ते नेटवर्क पर्यंत सगळीकडे चर्चा आहे ती Jio चीच. आता त्याला टक्कर देण्यासाठी वोडाफोन ग्राहकांना काही खास ऑफर्स आणि विशेष प्लान लाँच करत आहे. यादरम्यान वोडाफोन ने रिचार्जे प्लॅन Jio च्या 555 प्लॅनला टक्कर देत 499 रुपयाचा प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन जिओच्या प्लॅनपेक्षा स्वस्त का आहे?, 499 च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना काय सुविधा मिळणार ? आणि जास्त फायदा काय आहे हे पाहुया…

vodafone recharge plans 499 : यामध्ये ग्राहकांना 1.5 GB डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दिवसाला मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 70 दिवसांची वैधता मिळणार आहे. त्यात ZEE-5 अॅप सबस्क्रिप्शन आणि वोडाफोन पे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 70 दिवसात ग्राहकांना 105 GB डेटा मिळणार आहे.

jio recharge plan 599 : जिओच्या 599 रुपयांच्या प्लॅन मध्ये 84 दिवसांची वैधता आहे. यात दररोज 2 GB डेटा मिळणार आहे. युझर्सला 84 दिवसांसाठी एकूण 168 जिबी डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ unlimited free calling आणि जिओ ते इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं 84 दिवसांसाठी देण्यात आली आहेत. यासोबत रोज 100 फ्री SMS मिळणार आहेत.

जर आपण कॉलिंगचा जास्त वापर करत असाल तर, जिओपेक्षा वोडाफोन इतर नेटवर्कसाठी कॉलिंग सुविधा चांगली देत आहे. jio ला टक्कर देण्यासाठी Vodafone ने लाँच केलेला हा प्लॅन यशस्वी होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

You might also like