#YogaDay 2019 : ‘योग’साधना करताना ‘या’ ७ चुका टाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल प्रत्येक व्यक्ती फिट राहण्यासाठी नवनविन पर्याय शोधत आहे. धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनामुळे तणाव, थकवा, चिडचिडेपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी योगसाधना करणे हा एक उत्तम उपाय आहे. मात्र योगसाधना करण्याचे काही नियम असतात. ते न पाळल्यास फायद्याऐवजी नुकसानच होईल. २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे.

योगा आणि जेवणाची वेळ –

योगा करण्याच्या आधी जवळपास २ ते ३ तास जेवण करणे टाळा. शरीराला अन्नपचन करायला खूप ऊर्जा लागते त्यामुळे योग करताना थकवा जाणवू शकते. जेवल्यानंतर सुमारे ४ तासांनंतर योगसाधना करा. सकाळच्या वेळेस करणार असलात तर रिकाम्या पोटीही योगसाधना करु शकता.

दुखापत झाल्यास योगा करू नका –

तुमच्या शरीराला काही दुखापत झाली असेल. तर योगा करताना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबद्दलची माहिती तुमच्या योगप्रशिक्षकास अवश्य द्या.

मोबाईलपासून दूर राहा –

योगसाधना करताना मोबाईल जवळपास ठेऊ नका. कारण त्यामुळे लक्ष विचलित होते.

चुकीच्या कपड्यांची निवड –

योगा करताना सैलसर कपड्यांची निवड करा. योगा करताना तंग कपडे परिधान करू नका. नाहीतर योगा करण्याऐवजी तुमचे लक्ष कपड्यांकडे राहील.

गप्पा मारणे टाळा –

योगा करताना शक्यतो गप्पा मारणे टाळा किंवा कमीतकमी बोला. कारण बोलण्यामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ शकते.

टॉवेल जवळ बाळगा –

योगा करताना टॉवेल किंवा रुमाल जवळ बाळगा. योगा करताना घाम येत असेल तर टॉवेल किंवा रुमालाने टिपून घ्या.

अति उत्साहात योग करू नका –

योगा करताना अति उत्साह दाखवू नका. एखादी मुद्रा येत नसेल जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यामुळे शरीर आखडू शकते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.