गाडीमध्ये बसणारच होते BJP चे नेते, तेवढयात कारमधून निघाला अजगर अन् पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही तुमच्या चारचाकीमध्ये बाहेर चालला आहात आणि अचानक गाडीतून एक महाकाय अजगर बाहेर आला तर तुमची अवस्था काय होईल. मात्र असाच एक प्रकार झारखंडमधील भाजप नेते डॉ मनोज कुमार यांच्या बाबतीत घडला असून ते आपल्या गाडीत बसत असताना एक मोठा आणि लांब अजगर गाडीमध्ये आढळून आला. यामुळे त्याठिकाणी मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ मनोज कुमार हे आपल्या इंडिगो गाडीतून बाहेर जाण्यासाठी निघाले असता गाडीतून एक मोठा आणि लांब अजगर आढळून आला. गाडीच्या चाकाला एक इंडियन रॉक पायथॉन वेटोळे घालून बसलेला चालकाला आढळून आला. त्याने तात्काळ नेताजींना याची सूचना दिल्यानंतर त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली.

त्यानंतर वनविभागाची टीम घरी आल्यानंतर त्यांनी या अजगराला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांनी या अजगराला पकडण्यात यश मिळवले. यावेळी या अजगराला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये एका फळांच्या दुकानामध्ये देखील अजगर आढळून आला होता.

 

Visit : Policenama.com

You might also like