Vote From Home | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता घरूनच करता येणार मतदान; जाणून घ्या प्रक्रिया अन् कोणासाठी आहे ही सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vote From Home | उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Five State Assembly Elections) घोषणा झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढू लागल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा प्रचाराला ही मर्यादा आल्या आहेत. मतदारापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांपुढे आहेच, पण मतदानाची (Voting) मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मतदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग त्याचबरोबर कोरोनाबाधित यांना मतदानाचा हक्क बजावने कोरोनामुळे शक्य होणार नाही. त्यासाठीच निवडणूक आयोगाने (Central Election Commission) निवडणूक होणाऱ्या पाच राज्यातील मतदारांसाठी घरून मतदान (Vote From Home ) करण्याची सुविधा देऊ केली आहे. (Facility to vote from home)

 

पाच राज्यातील मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ही सुविधा लागू केली आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर यावे असा आयोगाचा आग्रह आहे. परंतु तरीही लोकांना नसेल जमत तर घरून मतदान करण्यासाठी आयोगाचा 12-डी हा अर्ज मतदारांना भरावा लागेल. त्यानंतर निवडणूक अधिकारी स्वत: त्यांच्या घरी जातील. घरून मतदान करणाऱ्या मतदारांची एक स्वतंत्र यादी तयार केली जाईल. तसेच हि यादी सर्व राजकीय पक्षांना दिली जाईल. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. (Vote From Home)

याआधी कुठे होती ही सुविधा ?
निवडणूक आयोगाने घरून मतदान करण्याची दिलेली सुविधेचा यापूर्वीही वापर करण्यात आला आहे. 2019 मध्ये झारखंड विधानसभा निवडणुकीच्या वेळी हि सुविधा दिली गेली होती. त्यावेळी केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांनीच या सुविधेचा लाभ घेतला होता. बिहार निवडणुकीतही केवळ तीन टक्के लोकांनीच याचा लाभ घेतला. गतवर्षी झालेल्या तामिळनाडू व पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीतही सुविधा देण्यात आली होती.

 

Web Title :-  Vote From Home | vote home how will process be who will get facility find out in details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in India | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था; फेब्रुवारीत कळस गाठण्याची शक्यता

 

Trupti Desai | सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण

 

KVP Interest Rate Change | ‘किसान विकास पत्र’चे (KVP) नवीन व्याजदर घोषित, जाणून घ्या आता किती आहे नवीन व्याजदर

 

Multibagger Penny Stock | ‘या’ स्टॉकने एक वर्षात 1 लाखाचे केले 83 लाख, शेयरमध्ये अजूनही तेजीत !