नवी दिल्ली : वोटर आयडी (Voter ID Card) आपल्या सर्वांसाठी आवश्यक डॉक्युमेंट आहे. जर तुमचे कार्ड (Voter ID Card) हरवले असेल तर अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे कार्ड पुन्हा डाऊनलोड करू शकता. वोटर आयडी मतदानाशिवाय ओळखपत्र म्हणून सुद्धा वापरले जाते. याशिवाय सरकारी कामकाजासठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो.
असे डाऊनलोड करा डिजिटल वोटर आयडी –
– डिजिटल वोटर आयडीसाठी voterportal.eci.gov.in वर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
– यानंतर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (https://www.nvsp.in/account/login) वर लॉगइन करावे लागेल.
– येथे लॉगइन केल्यानंतर EPIC नंबर किंवा फॉर्म रेफरन्स नंबर एंटर करा.
– आता रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी येईल.
– ओटीपी वेब पोर्टलवर एंटर करावा लागेल.
– यानंतर वेबसाइटवर काही ऑपशन दिसतील डाउनलोड ई-एपिक (Download e-EPIC) वर क्लिक करायचे आहे.
– आता डिजिटल वोटर आयडी पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड होईल.
कलरफुल आयडी कार्डसुद्धा बनवू शकता
याशिवाय तुम्ही कलरफुल आणि प्लास्टिक वोटरआयडी कार्डसुद्धा बनवू शकता. तुम्ही घरबसल्या कार्डसाठी अप्लाय करू शकता. हे आकाराने सुद्धा छोटे असते आणि प्रिंटिंग क्वॉलिटी सुद्धा खुप चांगली आहे. यासाठी केवळ 30 रुपये खर्च करावे लागतील. वोटरआयडीसंबंधी मदतीसाठी टोल फ्री नंबर 1950 वर संपर्क करू शकता.
Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत तेजी, विक्रमी स्तरापेक्षा 8576 रुपये ‘स्वस्त’