Lockdown मध्ये घरबसल्या बदलू शकता Voter ID मधील नाव, पत्ता आणि फोटो, ‘ही’ प्रक्रिया सोपी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू असताना तुम्ही या वेळेचा वापर सदुपयोग करून अशी कामे करू शकता, ज्यासाठी तुम्हाला कधी वेळ मिळत नव्हता. यातील एक काम आहे वोटर आयडीमधील नाव, पत्ता किंवा फोटो मधील काही त्रुटी दूर करणे. राष्ट्रीय मतदार ओळखपत्र म्हणजे वोटर आयडीची तुम्हाला मतदान करताना आवश्यकता असते. याशिवाय इतरही कामात ते ओळखपत्र म्हणून वापरले जाते.

वोटर आयडी मध्ये नाव किंवा पत्ता बदलण्यासाठी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (www.nvsp.in) वर लॉग-ऑन करावे लागेल. यानंतर वेगवेगळ्या सेवा वापरण्यासाठी वेबसाईटवर लॉग-इन करावे लागेल. जर तुम्ही पहिल्यांदाच लॉग-ऑन केले असेल तर पुढे जाण्यासाठी तुम्हाला साइन-अप करावे लागेल. लॉग-इन केल्यावर तुम्हाला नाव किंवा पत्ता बदलण्यासाठी फॉर्म ८ भरावा लागेल. इथे तुम्हाला नाव किंवा पत्ता बदलण्यासाठी आधार कार्ड, बॅंक पासबुक, ड्रायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट सारखे डॉक्युमेंटस अपलोड करावे लागतील. फॉर्म जमा केल्यानंतर एक रेफरन्स नंबर येईल, जो तुम्हाला नोट करून घ्यावा लागेल. या नंबरद्वारे तुम्ही तुमचा अर्ज तपासू शकता. व्हेरिफिकेशन नंतर नवीन वोटर आयडी तुमच्या पत्त्यावर पाठवला जाईल.

असा बदला फोटो
अनेक वेळा आयडीसाठी फोटो काढताना फोटो चांगला आलेला नसतो किंवा दुसरा कोणाचा तरी फोटो येतो. जर तुमचा जुना फोटो बदलायचा असेल तर तुम्हाला या पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर लॉग-इन केल्यावर तुम्हाला करेक्शन इन ‘पर्सनल डिटेल्स’ वर क्लिक करावे लागेल. इथे फोटो बदलायचा पर्याय मिळेल. तुम्ही महत्वाची माहिती देऊन फोटो बदलू शकता. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येईल. एका महिन्यात तुमचे नवीन वोटर आयडी अपडेट केले जाईल.