जळगाव, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान

सांगली  : पोलिसनामा ऑनलाईन

उद्या (1 ऑगस्ट) रोजी जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मागील काही दिवस राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी या ठिकाणी प्रचारासाठी हजेरी लावली होती.
दोन्ही महापालिका निवडणुकीत एकूण सात लाख 89 हजार 251 मतदार आहेत. त्यासाठी 1013 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 5 हजार 792 अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. निवडणुकांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली.
[amazon_link asins=’B07B4LDV55′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1a68a9c-94ce-11e8-848d-27effff18d2a’]
उद्या सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर निवडणुकीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी लागणार आहे.
सांगली- मिरज- कुपवाड महापालिका–  एकूण प्रभाग – 20, जागा – 78, उमेदवार – 451, मतदार – 4 लाख 24 हजार 179, मतदान केंद्रे – 544.
जळगाव महापालिका– एकूण प्रभाग –  19, उमेदवार – 303, मतदार – 3 लाख 65 हजार 72, मतदान केंद्रे  – 469.