home page top 1

महापालिका ,जि.प.आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी २३ जूनला मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकांचा निकाल लागून आचारसंहिता शिथील होत नाही, तोच राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहिर केला आहे.

नवी मुंबईसह, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी आणि चंद्रपूर अशा नऊ महानगरपालिकांमध्ये १५ रिक्तपदे आहेत. तर, रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमध्ये नऊ आणि विविध १६ पंचायत समित्यांमधील १६ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता येत्या २३ जून २0१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर, मतमोजणी २४ जून २0१९ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

या पोट निवडणुकांसाठीची नामनिर्देशनपत्रे ३0 मे २0१९ ते ६ जून २0१९ या कालावधीत दाखल करता येतील. २ व ५ जून २0१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ जून २0१९ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १0 जून २0१९ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाड्ढया उमेदवारांना ११ जून २0१९ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील.

२३ मे २0१९ रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ जून २0१९ रोजी सकाळी १0 वाजता सुरू होईल. चंद्रपूर महानगरपालिकेतील ६ ब आणि १३ ब या जागांसाठी,वर्ध्यातील झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारातील ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदियामधील आसोली (गोंदिया) या जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांसाठी आणि गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अजुर्नी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि 0हगणघाट (वर्धा) – वडनेर या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण येथे या निवडणुका होणार आहेत.

तसेच नागपूर येथे नव्याने निर्माण झालेल्या बुटीबोरी या नगरपरिषदेसाठीही निवडणूका २३ जूनलाच होणार असून त्यांचाही निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. तर, जळगाव – जामोद (बुलढाणा) – ८ अ, दारव्हा (यवतमाळ) – २ अ, मोहाडी (भंडारा) – ४,९ व १२, लाखांदूर (भंडारा) – १६, देवरी (गोंदिया) – ११, कोरपना (चंद्रपूर) – १५, मूल (चंद्रपूर) – ६ अ, भामरागड (गडचिरोली) – ५ आणि भामरागड (गडचिरोली) – १६ या नगरपरिषदांच्या रिक्त जागांकरताही याच दिवशी मतदान होणार आहे.

Loading...
You might also like