पावसामुळे मतदानाचा ‘टक्का’ घसरणार, उमेदवारांना भरली ‘धडकी’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अगोदरच मतदारांमध्ये मताधिकार बजावण्यात निरुत्साह आणि त्यात गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेला संततधार पाऊस यामुळे उद्या सोमवारी होऊ घातलेल्या निवडणूकीचा टक्का खालावणार असून याचा फटका उमेदवाराला बसणार हे निश्चित.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणूक उद्या सोमवारी होणार यासाठी प्रत्येक पक्षाने मतदार राजाला अनेक प्रलोभने-आश्वासने देऊन आपलंस करण्याचे प्रयत्न केले. काल सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला आणि पावसाने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. सायंकाळी पावसाला सुरुवात झाली आज रविवार सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या सरी कोसळू लागल्या. हा पाऊस उमेदवाराची झोप उडवणार, कारण उद्या पण असाच पाऊस राहण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाकडून प्रत्येक वेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. अनेक कलाकारांना यासाठी जाहिराती कराव्या लागतात. परंतु काही बहाद्दर या निवडणूकीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात. याचा परिणाम पाच वर्षासाठी भोगावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आपला हा पवित्र हक्क बजावला पाहिजे.

visit : Policenama.com