फॅशन डिझायनर ‘बेपत्ता’, ‘या’ अभिनेत्रीने मागितली सोशल मीडियावर मदत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने ट्विटरवर एका गोष्टीसाठी मदत मागितली आहे. सोहाने ट्विट केलं आहे. ज्यात तिने एका मुलीचा फोटो शेअर केला आहे आणि ती बेपत्ता असल्याचं सांगितलं आहे. सोहाने मोबाईल नंबरही शेअर केला आहे.

अहमदाबादच्या वस्त्रापूरमधील रहिवाशी 23 वर्षीय वृ्ष्टी जसुभाई गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता आहे. महत्त्वाची बाब अशी की, वृष्टीचा बॉयफ्रेंड शिवम पटेल देखील आपल्या घरातून बेपत्ता असल्याचं समजत आहे.
फैशन डिजाइनर लापता, बॉलीवुड अभिनेत्री ने सोशल मीडिया पर लगाई ये गुहार

सोहाने सोशल मीडियावर अपील करत लिहिलं आहे की, “कृपया मदत करा. वृष्टी जसुभाई आता 2 दिवसांपासून बेपत्ता आहे आणि तेव्हापासून तिचा फोन नॉट रिचेबल आहे. ती अहमदाबादमध्ये राहते, तिचे आई-वडील खूप काळजीत आहेत. मो. +919099908230” सोहाने हे ट्विट 3 तारखेला केलं आहे. तेव्हा वृष्टी बेपत्ता होऊन 2 दिवस झाले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय वृष्टीचे कुटुंबीय परदेशात राहतात आणि ती एकीटच इथे रहाते. वृष्टी फॅशन डिझायनर आहे. अहमदाबादच्या नवरंगपुरा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, वृष्टीचा बॉयफ्रेंड शिवम पटेलही घरातून बेपत्ता आहे.

फैशन डिजाइनर लापता, बॉलीवुड अभिनेत्री ने सोशल मीडिया पर लगाई ये गुहार

पोलिसांनी जेव्हा दोघांचे मोबाईल नंबर ट्रेस केले तेव्हा शेवटचं लोकेशन मेहसाणा दाखवत आहे. वृष्टीच्या ड्रायव्हरने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली आहे. असे सांगितले जात आहे की, वृष्टीला शेवटचं तिच्या ड्रायव्हरनेच घरी सोडलं होतं. यानंतर ती घरी परतलीच नाही. पोलिसांनी दोघांचाही तपास सुरु केला आहे.

फैशन डिजाइनर लापता, बॉलीवुड अभिनेत्री ने सोशल मीडिया पर लगाई ये गुहार

फैशन डिजाइनर लापता, बॉलीवुड अभिनेत्री ने सोशल मीडिया पर लगाई ये गुहार

फैशन डिजाइनर लापता, बॉलीवुड अभिनेत्री ने सोशल मीडिया पर लगाई ये गुहार

फैशन डिजाइनर लापता, बॉलीवुड अभिनेत्री ने सोशल मीडिया पर लगाई ये गुहार

visit : Policenama.com