आता घरबसल्या घ्या ‘थिएटर’ची मजा, Vu ने लाँच केला Cinema Tv

पोलीसनामा ऑनलाइन  – भारतीय कंपनी Vu ने नवीन Cinema TV सीरीज लॉन्च केली आहे. यामुळे आता ग्राहकांना घरबसल्या थिएटर ची मजा अनुभवायला मिळणार आहे. हा टीव्ही लॉन्च करून थिएटर चे पैसे वाचवून घरबसल्या थिएटरचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे. असे कंपनीच्या CEO देविता सराफ यांनी म्हंटले आहे. कंपनीने सिरीजअंतर्गत तीन मॉडेल्स लॉन्च केले आहेत.

नव्या Cinema TV चे फीचर्स

* यात ‘पिक्सेलियम ग्लास टेक्नॉलॉजी’ चा वापर करण्यात आला आहे.
* या टीव्ही ला 4K रिझोल्युशनला सपोर्ट करतात.
* आवाजासाठी 40W बिल्ट इन साउंडबार आणि डॉल्बी प्रोसेसर ऑडिओ आहे.
* अँड्रॉइड 9.0 पायवर कार्यरत असेल. सर्व प्रमुख OTT सेवांचा सपोर्ट टीव्हीला आहे.
* टीव्हीमध्ये स्लीक फ्रेमलेस डिझाइन दिली आहे. टीव्हीसोबत ‘बिल्ट इन माइक्रोफोन’ आणि ‘पाच हॉट की’ असलेले ActiVoice रिमोट मिळते.

कपंनीने ३ मॉडेल्स लॉन्च केले आहेत. 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच त्यांची किंमत अनुक्रमे 26,999 रुपये, 29,999 रुपये आणि 33,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. येत्या १८ जानेवारीपासून या टीव्हींची विक्री अमेझॉनच्या संकेतस्थळावर सुरु होईल.

कंपनीने स्क्रीन साइजच्या आधारे तीन मॉडेल्स लाँच केले आहेत. 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच स्क्रीन साइजसह हे तीन मॉडेल्स बाजारात उतरवण्यात आलेत. यांची अनुक्रमे किंमत 26,999 रुपये, 29,999 रुपये आणि 33,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 18 जानेवारीपासून या टीव्हींची विक्री अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर सुरू होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/