पाकिस्ताननं बनविले नेत्यांसाठी ‘शौचालय’, त्यावरून लोकांनी केली ‘मौज’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सध्या पाकिस्तानात इमरान खान सरकारने विविध निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यात विशेष नेत्यांसाठी VVIP शौचालये बनवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या शौचालयाचा वापर अतिरिक्त सचिव आणि उच्च स्तरीय अधिकारी घेऊ शकतात.

इमरान खान सरकारने राजधानी इस्लामाबाद येथे मंत्रालयात असे VVIP शौचालये बनवली आहेत. ज्यात जाण्यासाठी बॉयोमेट्रिक ओळख दाखवल्याशिवाय वापर करता येणार नाही, ते एवढ्यासाठी की त्याचा वापर अधिकारी आणि मंत्र्यांव्यतिरिक्त इतरांना करता येऊ नये.

या शौचालयाचा वापर फक्त अतिरिक्त सचिव आणि उच्च स्तरीय अधिकारी करु शकतील. हे शौचालय उद्योग व उत्पादन मंत्रालयात बनवण्यात आले आहेत.

या सर्व बाबींमुळे ही शौचालये चर्चेचा विषय झाली आहेत , कारण एकीकडे VVIP शौचालये बनवण्यात आली आहेत तर दुसरीकडे इतर मंत्रालयांच्या बाथरुम मध्ये अत्यंत आवश्यक साबन देखील उपलब्ध नाहीत. यामुळे इमरान खान यांच्या सरकारवर टीका करण्यात येत आहे. देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंतेची असताना पाकिस्तान सरकार मात्र काही विशेष अधिकाऱ्यांसाठी विशेष सेवा देत आहे.

ही माहिती बाहेर आल्यावर सोशल मिडियावर पाकिस्तानातीलच लोक सरकारवर व्यंगात्मक टीका करत आहेत. इमरान खान यांच्या VVIP संस्कृतीला संपण्याच्या विधानाची आठवण करुन देत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like