पुणे मनपाकडून शहरातील ‘त्या’ ३५० वाडयांना नोटिसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील पेठामधील वाडे हे पुण्यातील ऐतिहासिक वैभव मानले जाते. मात्र हेच वैभव आता तेथील रहिवाश्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका आहे. पुणे महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात वाड्यातील रहिवाश्यांसाठी नोटीस बजावत असते. त्यात पहिल्याच पावसात कोंढावा येथे भिंत कोसळून १५ लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा धसका घेऊन पुणे महापालिकेने पुण्यातील धोकादायक वाड्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिकेने शहरातील ३५० धोकादायक वाड्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. तर त्यातीलही अधिक धोकादायक वाडे पाडण्यासही सुरुवात केली आहे. शुक्रवार पेठेतील अतिधोकादायक असलेले २ वाडे पालिकेने जमीनदोस्त केले आहेत. या शनिवार पेठेतील काही वाड्यांची अवस्था अतिशय धोकादायक असूनही तेथील भाडेकरू दुसरीकडे राहण्याची सोय नसल्याने जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यावर या रहिवाश्यांना येथून हलवून सुरक्षित जागेवर त्यांची राहण्यासाठी पाठवण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे, असं पुण्याच्या महापौर मुक्त टिळक यांनी सांगितलं.

दरम्यान, पालिकेने सांगितल्यानुसार पूर्णपणे या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर येत आहे. वाड्यातील रहिवाश्यांना नोटीसा पाठवूनही धोकादायक वाड्यातील भाडेकरू तेथे राहत आहेत. त्यामुळे पालिका आपले काम करण्यात अपयशी होत आहे का?, असा प्रश्न समोर येत आहे. कारण पालिका स्वतः फक्त नोटीसा पाठवत असली तरी तेथील लोकांची जागेवरचा हक्क न सोडण्याची भूमिका त्यांना तेथून जाण्यासाठी प्रवृत्त करत नाही. त्यामुळे धोकादायक वाड्यांच्या बाबतीत पालिकेने महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय