वाघोलीतील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 100 पार

वाघोली : (ता:हवेली) –  कोरोना रुग्णांच्या खालावलेल्या आकड्याने पुन्हा एकदा उसळी घेतली असून १४ जुलै रोजी दिवसभरात ५ कोरोना रुग्णांची वाढ तर एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वाघोलीत आत्तापर्यंत १०१ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३८ रुग्ण बरे झाले असून ६१ रुग्ण अ‍ॅक्टीव आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. मांजरी खुर्द येथे दिवसभरात चार कोरोना रुग्णांची वाढ झाली असून एकूण १५ रुग्णांपैकी ८ रुग्ण अ‍ॅक्टीव आहेत. आव्हाळवाडी येथे दिवसभरात दोन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून येथील ५ रुग्ण अ‍ॅक्टीव आहेत.

स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात आले आहे की स्वतःची काळजी घ्या तोंडाला मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा वेळोवेळी हात धुवा महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका.

डॉ नागसेन लोखंडे आरोग्य अधिकारी वाघोली

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like