वाघोलीत घंटानाद करणार्‍यांवर FIR दाखल

शिक्रापुर : संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचे संकट घोगावत आहे. प्रशासनाकडून संसर्ग रोखण्याकरता विविध उपाय योजना केल्या जातात. तर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून देखील जिल्ह्यातील कार्यक्षेत्र खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच व त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन नये असे आदेश जारी करण्यात आले आहे. असे असताना देखील पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी वाघोली ग्रामपंचायत समोर बेमुदत घंटानाद आंदोलन करणार याकरिता पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता.त्यानुसार सी आर पी सी १४९ प्रमाणे सर्जेराव वाघमारे सुरज मांदळे,पंडीत डोंगरे यांना नोटीस बजावण्यात आली होती .असे असताना देखील १७ ऑगस्ट रोजी वाघोली ग्रामपंचायत कार्यालय समोर आंदोलनकर्त्यांनी गर्दी जमवत वाघोली गायरान जमिनीवरील बांधकाम कायमस्वरूपी करावी तश्या नोंदी वाघोली ग्रामपंचायतने केला नाही त्या नोंदी तात्काळ करून घ्याव्यात या मागणी करता पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली परवानगी नसतानाही ५० ते ६० कार्यकर्त्यांना एकत्र जमवत सोशल डिस्टंसिंगचे नियमांचे उल्लंघन करत आंदोलन केले.त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची अवमान्यता ,उल्लंघन केल्याप्रकरणी भा.द वि कलम १८८ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लोणिकंद पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जगदाळे यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे.तर पुढील तपास लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करणार आहेत याबाबत पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांच्याशी “पोलिसनामा “ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कायदा हा सर्वांसाठी समान आहे .ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच प्रमाणे वाघोली मध्ये १६ ऑगस्ट रोजी भाजपचे खासदार गिरीष बापट, माजी आमदार बाबुराव पाचर्णे,जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमत सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते त्यामुळे खासदार ,माजी आमदार यांच्यावर देखील पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करणार का ? का सर्वसामान्य कार्यकर्तेना एक न्याय आणि राजकीय नेत्यांना दुसरा न्याय अशा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला..