वाघोलीतील कचरा वाडेबोल्हाईच्या वेशीवर !

शिक्रापुर : हवेली तालुक्यातील स्वच्छ आणि सुंदर गाव पुरस्काराने नुकत्याच सन्मानित झालेल्या वाडेबोल्हाई गावच्या हद्दीतील राहू रोड लगत वाघोलीतील कचऱ्याने भरलेला खाजगी डंपर आणून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या वतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.तर या अशा खोडसाळपणा मुळे आणि उघड्यावर टाकलेल्या कचऱ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे यांनी सांगितले.

याबाबत दिलेल्या तक्रारी अर्ज नुसार, मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास वाडेबोल्हाई हद्दीत राहू रोडलगत संपूर्ण कचऱ्याने भरलेला डंपर खाली करण्यात आला आहे. या कचऱ्यामुळे वाडेबोल्हाई परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तरी अशा अपप्रवृत्तींना वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे. सदर डंपरचा सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यामातुन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो ग्रामपंचायत केसनंदच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसुन येत असुन डंपरचा क्रमांक दिसत नाही परंतु डंपर मधील कचरा हा वाघोली परीसरातील कचरा जमा करणा-या स्थानिक कंत्राटदाराने टाकला असण्याची दाट शक्यता आहे. तरी सदर डंपरचा शोध लावुन डंपर चालक व कंत्राटदार यांच्यावर वाडेबोल्हाई हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याअधि देखील बाडेबोल्हाई हद्दीत कचरा टाकणारा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करत कचरा उचलण्यास भाग पाडण्यात आले आहे. या बाबत वाघोलीचे ग्रामसेवक अनिल कुभांर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले

ग्रामपंचायतच्या करारात फक्त कचरा उचलण्याचा करार आहे.तो कोढे टाकायचा हा त्याच्या प्रश्न सबधित ठेकेदाराचा आहे.परंतु अशा प्रकार झाला असेल तर त्याला याबाबत पञ काढण्यात येईल तर वाघोलीचे माजी उपसरपंच शिवदास उबाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही

प्राथमिक माहितीनुसार संबंधित कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला एका गाडीसाठी ग्रामपंचायत कडून हजारो रुपये देण्यात येतात. मात्र या ठेकेदाराकडून कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असताना हा कचरा असा इतरत्र टाकून दिला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा परिसर खराब होत आहे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येत आहे त्यामुळे संबंधित कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे