पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Wagholi Pune Crime News | दिवाळीला गावी जाताना त्यांनी आपल्या शेजारच्यांकडे घराची चावी देऊन घरातील कुंड्यांमधील झाडांना पाणी घालण्यास सांगितले. शेजारच्यांनीही हे काम स्वीकारले. दिवाळीनंतर परत घरी आल्यावर त्यांच्या घरातील २३ लाख रुपयांचे ५८ तोळे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणार्यांवर संशय व्यक्त केला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत गौरव आदर्श गेरा (वय ३७, रा. रोहन अभिलाषा सोसायटी, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात (Wagholi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी र्त्यांच्या शेजारी राहणारे निखील गुप्ता (वय ३५), तन्वी गुप्ता (वय ३२, रा. रोहन अभिलाषा सोसायटी, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादी यांच्या घरी २८ ऑक्टोबर ते १९ नोव्हेबर २०२४ रोजी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांशेजारी राहतात. गौरव गेरा हे आपल्या कुटुंबासह दिवाळी सणासाठी उत्तर प्रदेशातील गावी जाणार होते. गावी जाताना त्यांनी घराची चावी त्याच सोसायटीतील निखील गुप्ता यांच्याकडे दिली. त्यांचे घरातील कुंड्यांमधील झाडांना पाणी टाकण्यास सांगितले होते. फिर्यादी यांनी त्याचे कपाटात ठेवलेले २३ लाख रुपयांचे ५८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिन्यांचा अपहार करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.