Wagle Estate | ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यातील वागळे इस्टेट (Wagle Estate) येथील रामनगर परिसरातील एका नाल्यात दीड ते दोन आठवड्यांचे मगरीचे पिल्लू (Crocodile puppies) सापडले आहे. मार्श प्रजातीच्या (marsh species) मगरीचे हे पिल्लू पुनर्वसू फाउंडेशन (Rehabilitation Foundation) या वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या (Wildlife Welfare Association) सदस्यांनी पकडले आहे. सध्या हे पिल्लू त्यांच्याच निगराणीत आहे. 2 वर्षांपूर्वी देखील याच नाल्याच्या परिसरात मगरीचे पिल्लू आढळले होते. मात्र हे पिल्ले नेमके कुठून येतात असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांना येथे कोणी आणून सोडतात का, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्या नाल्यात मगर येणे खूप कठीण आहे. newborn crocodile cubs found in wagle estate at thane

सापडलेल्या 1 फुटाच्या पिल्लाचे वजन 100 ग्रॅम आहे.

मामा-भाचे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या रामनगर परिसरातून जाणाऱ्या नाल्यात स्थानिकांना सोमवारी (दि.14) दुपारी मगरीचे पिल्लू निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने ही माहिती पुनर्वसू फाउंडेशन या वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांना दिली.माहिती मिळताच पनर्वसू फाऊंडेशनच्या सदस्यांनी धाव घेत जिवंत पिल्लाला पकडून त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी (Medical test) केली. त्यावेळी त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले.सध्या या नववजात पिल्लाची काळजी घेतली जात आहे. याबाबत पुनर्वसू फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य पाटील म्हणाले की सापडलेल्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली असून त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वनविभागामार्फत सोडण्यात येईल. अवघ्या दीड ते दोन आठवडयाचे हे पिल्लू आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : wagle estate | newborn crocodile cubs found in wagle estate at thane

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’