Waist Obesity : कमरेवरील लठ्ठपणामुळे अस्वस्थ आहात ? जाणून घ्या चरबी कमी करण्याचे सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल बरेच लोक लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत आणि हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यामध्ये अनेक लोक असे आहेत जे कमरेवरील लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत. आयुर्वेदानुसार, लठ्ठपणा वात, पित्त आणि कफ यांचा असमतोल झाल्यामुळे येतो. खासकरून कफ दोष असंतलूत झाल्याने ही समस्या वाढते, ज्यामुळे शरीरात उपस्थित असलेले मेद या धातूला असंतुलित करते. जर तुमच्या पोटावर थोड्याप्रमाणात चरबी असेल तर याला सामान्य मानले वाजते. पण जर ही चरबी जास्त असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. बदलते राहणीमान आणि धावपळ त्यामुळे चुकीचा आहार घेतला जातो. ज्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते.

कमरेजवळ चरबी वाढण्याचे मुख्य कारण आहे एडीपोज टिशु
याशिवाय याठिकाणी रक्ताचे वहन जलद असते त्यामुळे येथे फॅट जमा होते. याशिवाय आपल्या बसण्याच्या पोस्चरमुळे बराच फरक पडतो. जर तुम्ही दिवसभर एका ठिकाणी जास्त वेळ बसून काम करत असाल तर ही समस्या वाढते. तुमची पचनक्रिया सुरळीत नसणे हे यामागील मुख्य कारण आहे.

सहसा असे दिसते की, पुरुषांच्या तुलनेत महिला या समस्येला मोठ्या प्रमाणात बळी पडल्या आहेत. पचनक्रिया खराब झाल्यामुळे थॉयराइट आणि शुगर या समस्या निर्माण झाल्या आहेत.

कमरेचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपाय
कमरेवरील लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात बदल करावा लागेल आणि व्यायाम करावा लागेल.

यापद्धतीच्या आहाराचा समावेश करा
आठवड्यातून कमीत कमी एकदा कार्बोहायड्रेटचे सेवन करा.
हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. जसे की कारले, पालक, भेंडी, शुद्ध वनस्पती तूप, ट्रान्स फॅटचे सेवन टाळा.
सैच्युरेटेड फॅट असलेले अन्न खाऊ नका.
मिठाई आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी ठेवा.
मैदा, साखर आणि भात कमी प्रमाणात करा.
दिवसातून तीन वेळा पोटभर जेवल्याने पाचक यंत्र व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे दर २ ते ३ तासांनंतर थोडे थोडे खात रहा.
दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी पिणे शरीरासाठी उपयुक्त आहे. पाणी तोपर्यंत पिऊ नका जोपर्यंत तहान लागणार नाही. थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या. असे केल्याने ओव्हर इटिंगच्या सवयीवर परिणाम होईल.