कष्टाचं झालं चिज ! वेटर बनला पोलिस उपनिरीक्षक

गारगोटी : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच महाराष्ट्र लोकसवा आयोगच्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) परिक्षेचा निकाल लागला आहे. यामध्ये भुदरगड तालुक्यातील येथील संदीप नामदेव गुरव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत राज्यात सहावा, तर इतर मागासवर्ग प्रवर्गात पहिला क्रमांक पटकावला. मात्र हा पोलिस उपनिरीक्षपदापर्यंतचा प्रवास संदीपसाठी नक्कीच सोपा नव्हता.

संदीपच्या घरात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. केवळ अर्धा एकर जमीन व दूध व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रतिकूल परिस्थितीमुळे संदीपने आठवीनंतर शाळा सोडून हॉटेलमध्ये वेटरचे काम सुरु केले होते. मात्र आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे अशी इच्छा त्याच्या मनात आली आणि पुन्हा जिद्दीने शाळेचा रस्ता धरला.

संदीपचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पाल, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, पालमध्ये तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण गारगोटी येथील कर्मवीर हिरे कॉलेजमध्ये झाले. प्राथमिक शाळेतून बाहेर पडल्यावर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत प्रवेश घेतल्यावर घरच्या परिस्थितीमुळे आणि शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे संदीपने शाळा सोडून सांगलीला जाऊन हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. दोन वर्षे हॉटेलमध्ये काम केल्यानंतर त्याला आयुष्यात काहीतरी करावे असे वाटू लागले. शिक्षणाचे महत्व समजल्यामुळे त्याने पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय अधिकारी व्हायचे हा निश्चय केला आणि अभ्यासाला सुरुवातही केली. पण मार्गदर्शनासाठी कोल्हापूर, पुण्यासारख्या शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्रात जाणे परिस्थितीमुळे जाणे शक्य न झाल्याने घरीच राहून परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. २०१३ पासून राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. सलग दोन प्रयत्नांत अपयश येऊनही जिद्दीने पुन्हा प्रयत्न सुरूच ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. पुढे अभ्यास सुरूच ठेवणार असून, आयपीएस अधिकारी बनण्याची मनोदय संदीपने व्यक्त केला.

संदीपचे आई-वडील शेतकरी असून अशिक्षित आहेत. घरची अवघी अर्धा एकर जमीन, दूध व्यवसायावर कुटुंबाची गुजराण तसेच मुलांना शिक्षण देण्यासाठी त्याच्या पालकांनी घेतलेले कष्ट नक्कीच वाखाणण्यासारखे आहे.

ह्याहि बातम्या वाचा


?चार महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून करून पती पसार


?माढ्यात शरद पवारांविरोधात ‘हा’ नेता रिंगणात

?”गडकरींविरोधात मी लढलो तर प्रकाश आंबेडकर उमेदवार देणार नाहीत”

?प्रकाश आंबेडकरांकडून सुशीलकुमार शिंदेंनाआव्हान ; सोलापुरात तिरंगी लढत

?”जे आमच्या मनात ते राज ठाकरेंच्या ओठावर”

?नगरच्या जागेबाबत आज अंतिम निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

?प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लोकसभा लढणार