लग्न सोहळ्यात PPE किट घालून जेवण वाढताना दिसले वेटर, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याचा सल्ला सतत दिला जात आहे. मात्र, या काळात सुद्धा लग्न आणि पार्टीचे वातावरण कमी झालेले नाही. लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होण्यास प्रतिबंध आहे. नुकतेच आंध्र प्रदेशात झालेल्या एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे. या व्हिडिओत वेटर्स पीपीई किट घालून जेवण वाढताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये लग्न सोहळ्यात लोक एकमेकांपासून खुप अंतर राखून बसलेले दिसत आहेत. तर, व्हिडिओत काही वेटर्स जेवण वाढताना दिसत आहेत. जे वेटर्स जेवण वाढत आहेत त्यांचे कपडे सामान्य नसून, त्यांनी पीपीई किट आणि फेस शिल्ड घातले आहे.

22 जुलैला कृष्णा जिल्ह्यात झाला विवाह
रिपोर्टनुसार, 22 जुलैला आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्याच्या मुदिनेपल्ली गावात हे लग्न झाले होते. लग्नात आयोजकांनी कॅटरर्सला निर्देश दिले होते की, त्यांनी आपल्या सहकार्‍यांना कोरोना महामारीमुळे पीपीई किट घालून जेवण वाढण्यास सांगावे. या लग्नात सुमारे 200 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

आयोजकांनी लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगितले तसेच वेटर्सना पीपीई किट घालण्यास सांगितले.

आंध्र प्रदेशात वेगाने वाढत आहेत आकडे
आंध्र प्रदेशात कोरोना रूग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. येथे 80 हजारपेक्षा जास्त कोरोनाच्या केस समोर आल्या आहेत. तर 933 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 39935 संक्रमित लोक उपचारानंतर बरे झाले आहेत, तर 39990 संक्रमित रूग्णांवर उपचार सुरू आहे.