वाजिद खानचं सलमानसोबत होतं ‘असं’ खास नातं, आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं गाणंही ‘भाईजान’साठीच !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड आणि मनोरंजन जगतसाठी हे वर्ष म्हणजे जणू काही शापच बनला आहे. आधी दिग्ग्ज स्टार ऋषी कपूर त्यानंतर इरफान खान आणि इतरही अनेक कलाकार असे आहेत ज्यांचं निधन झास. असं असताना आणखी एक वाईट बातमी समोर आली ती म्हणजे प्रसिद्ध सिंगर आणि कंपोजर वाजिद खानच्या निधनाची. 42 वर्षीय वाजिदच्या निधनानंतर देश पुन्हा एकदा स्तब्ध झाला आहे. साजिद-वाजिदची प्रसिद्ध जोडी आता फुटली आहे. साजिद-वाजिद या जोडीचं सलमान खान सोबत खास कनेक्शन होतं.

1998 मध्ये आलेल्या प्यार किया तो डरना क्या या सिनेमातून साजिद-वाजिद यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. सलमान सोबत करिअरचती सुरुवात करणाऱ्या या जोडीनं बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत.

याचदरम्यान त्यांनी सलमानसाठी देखील अनेक गाणी कंपोज केली. गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग अशा अनेक सिनेमात यांचं योगदान होतं. जवळपास प्रत्येक गाण्यात वाजिदचा आवाज आहे. वाजिदनं सलमान खानचं फेमस गामं जलवा, फेविकॉल से आणि अक्षय कुमारच्या चिंता ता चिता चिता या गाण्याला आवाज दिला होता. बिग बॉस 4 आणि बिग बॉस 6 चा टायटल ट्रॅकही त्यानंच तयार केला होता.

वाजिदनं पार्टनर, एक था टायगर, वांटेड असा अनेक सिनेमात आपला आवाज देऊन हे दाखवून दिलं होतं की, त्याच्या मनात सलमान खान प्रति किती प्रेम आहे. जाता जाता देखील वाजिदनं सलमानच्या प्यार करोना आणि भाई भाई ही गाणी कंपोज करत आपल्या दोस्तीची मिसाल दिली.

वाजिद खान कि़डनीच्याआजारानं ग्रस्त होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. रविवारी (दि 31 मे) त्याची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्याला चेंबूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like