‘कोरोना’मुळं नव्हे तर ‘या’ कारणामुळं झालं वाजिद खानचं निधन ! कुटुंबियांचा ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध सिंगर आणि कंपोजर वाजिद खानचं निधन झालं आहे. वाजिद खान किडनीच्या आजारानं ग्रस्त होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. रविवारी (दि 31 मे) त्याची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्याला चेंबूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर 1 जून 2020 रोजी वाजिदचं निधन झालं. यानंतर आता वाजिदच्या कुटुंबियांनी त्याच्या निधनाचं खरं कारण सांगितलं आहे. त्याचं निधन किडनी संसर्गामुळं नाही तर कार्डियक अरेस्टमुळं झाला आहे.

वाजिदच्या कुटुंबियांनी सांगितलं की, “आपले प्रिय वाजिद खान यांनी वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 1 जून 2020 रोजी कार्डियक अरेस्टमुळं मुंबईच्या सुराना सेतिया हॉस्पिटलमध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या वर्षी त्यांच्यावर यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली होती. यानंतर घशाचा संसर्ग बळावल्यामुळं त्यांच्यावर उपचार सुरू होते.”

1998 मध्ये आलेल्या प्यार किया तो डरना क्या या सिनेमातून साजिद-वाजिद यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. सलमान सोबत करिअरचती सुरुवात करणाऱ्या या जोडीनं बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत.

याचदरम्यान त्यांनी सलमानसाठी देखील अनेक गाणी कंपोज केली. गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग अशा अनेक सिनेमात यांचं योगदान होतं. जवळपास प्रत्येक गाण्यात वाजिदचा आवाज आहे. वाजिदनं सलमान खानचं फेमस गामं जलवा, फेविकॉल से आणि अक्षय कुमारच्या चिंता ता चिता चिता या गाण्याला आवाज दिला होता. बिग बॉस 4 आणि बिग बॉस 6 चा टायटल ट्रॅकही त्यानंच तयार केला होता.