पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे अमिष दाखवून एका संगणक अभियंता तरुणीवर तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाने पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

पीडित तरुणीच्या (वय-29) तक्रारीवरून वाकड पोलिसांनी अभिलाष अंबरनाथ शिवनगर (वय-27 रा. नागपूर) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 21 सप्टेंबर 2019 ते 22 मार्च 2020 दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अभिलाष हे दोघे हिंजवडी येथील एकाच कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.

आरोपी अभिलाष याने पीडित तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर महाबळेश्वर येथील लॉजवर तसेच वाकड येथे वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने त्याच्याकडे लग्नासंबंधी विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच त्याने प्रकारे संपर्क करु नको, अशी धमकी दिली. पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.