Wakad Crime News | पिंपरी : मानसिक रुग्ण असलेल्या महिलेची चिमकल्यासह आत्महत्या, अमेरिकेतून उपचारासाठी पुण्यात आली होती

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Wakad Crime News | मानसिक आजाराशी झुंजत असलेल्या महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन उडीमारुन आत्महत्या केली. ही घटना वाकड परिसरातील यमुनानगर (Yamuna Nagar Pune) येथील रेगालिया या उच्चभ्रू सोसायटीत शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Murder Case)

कोमल संकेत आवटे-हरिश्चंद्र (वय 32, सध्या रा. रेगालिया, सोसायटी मुळ रा. ह्युस्टन टेक्सास, अमेरिका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत विहान संकेत आवटे (वय-4) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत कोमल यांचे सासरे रमाकांत विष्णूपंत आवटे (वय-71 रा. रेगालिया को. सोसायटी, यमुनानगर वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Wakad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल यांच्या पतीला अमेरिकेत नोकरी आहे. त्यामुळे त्या पतीसोबत अमेरिकेत राहत होत्या.
त्याठिकाणी त्या मानसिक आजाराने त्रस्त झाल्या. कोमल यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु होते.
त्यांचा मानसिक आजार कमी होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी त्या भारतात परतल्या होत्या. त्यांच्यावर पुण्यात उपचार करण्यात येणार होते.

कोमल आणि विहान हे दोघेही वाकड येथील वडिलांच्या घरी आले. त्यांच्यासोबत सासू-सासरे देखील होते. मानसिक त्रास जाणवू लागल्याने कोमल घाबरल्या होत्या. त्यांनी शनिवारी पहाटे साडेपाच वाजता इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन मुलगा विहान याला कडेवर घेऊन उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : प्रेमसंबंधातून महिलेचा खून, आरोपीला काही तासात गुन्हे शाखेकडून अटक (Video)

Health Insurance | मोठा निर्णय! आता हेल्थ इन्श्युरन्ससाठी नाही वयाचे बंधन, आजारी व्यक्तीही घेऊ शकतात विमा, 65 वर्षांची वयोमर्यादा हटवली