Pimpri Chinchwad News | रिक्षाचालकांकडे 2 हजार रुपये खंडणी मागणार्‍या टोळीतील 5 जणांना अटक

पिंपरी- चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – वाकड (Wakad)  येथील कॅपिटल टॉवरच्या (Capital Towers Wakad) बाजूला रिक्षा लावून थांबलेल्या रिक्षाचालकांकडे २ हजार रुपये हप्ता मागणार्‍या व रिक्षांची तोडफोड करुन दहशत पसरविणार्‍या ५ जणांच्या टोळक्याला वाकड पोलिस स्टेशनच्या (wakad police station) अधिकारी व कर्मचार्‍यांनीअटक केली आहे.

अनोख्या पबची आकर्षक सजावट, छताला लटकली आहे 20 लाखाची कॅश; चोरली तरी खर्च करता येणार नाही

किरण प्रकाश घाडगे (वय ३५),
चंद्रकांत सिताराम गायकवाड (वय २२),
मयुर संजय अडागळे (वय २६),
सागर प्रकाश घाडगे (वय २७, सर्व रा. म्हातोबानगर, वाकड) आणि
अविनाश नलावडे (रा. आदर्श कॉलनी, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

याप्रकरणी मारुती साहेबराव काळे (वय ३०, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. म्हातोबानगर येथील कॅपिटल टॉवरच्या बाजूला फिर्यादी व त्यांचे मित्र रात्री साडेअकरा वाजता गप्पा मारत थांबले होते.
यावेळी परिसरातील गुंडगिरी करणारे टोळके हातात लाकडी दांडके घेऊन तेथे आले.
त्यांनी फिर्यादी यांना व सोबतच्या लोकांना महिना २ हजार रुपये हप्ता द्या, नाही तर तुम्हाला धंदा करु देणार नाही अशी धमकी देऊन खंडणी मागितली.
त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्यांनी तेथे पार्क केलेल्या ५ रिक्षांवर लाकडी दांडक्याने फोडल्या.

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

तसेच सचिन अशोक शेलार (वय २६, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) हे तेथे थांबलेले असताना आरोपींनी त्यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले.
त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर किरण घाडगे याने शिवीगाळ करीत त्यांच्या शर्टच्या खिशातील ६०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तेथे पार्क केलेल्या ६ रिक्षांच्या समोरील काचा फोडल्या.
वाकड पोलिसांनी खंडणी (Wakad Police) व दरोड्याचा गुन्हा दाखल करुन ५ जणांना अटक केली आहे.

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  Pimpri Chinchwad News | Five members of a gang demanding Rs 2,000 ransom from rickshaw pullers arrested