Wakad Pimpri Crime | पिंपरी : वाकड येथे नाकाबंदीत मोटारीसह 27 लाखांची रोकड जप्त (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Wakad Pimpri Crime | निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख रक्कम पकडली आहे. वाकडमध्ये मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वाकड-हिंजवडीला जोडणाऱ्या (Wakad Hinjewadi Road) राजीव गांधी पुलाखाली लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान एका मोटारीतून ही रोकड जप्त करण्यात आली.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी (Maval Lok Sabha) गुरुवारपासून (दि.18) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मतदार संघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून विविध घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन, आमिष दाखवली जाण्याची शक्यता असते. त्याला पायबंदी घालण्यासाठी प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. यासाठी शहरात जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे. निवडणूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून नाकाबंदी सुरू होती.

निवडणूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून वाकडमध्ये नाकाबंदी (Nakabandi In Wakad) सुरू होती. त्यावेळी मुंबईकडून वाकडच्या दिशेने एक चारचाकी मोटार येत होती. पथकाने मोटारीला थांबवून तपासणी केली. त्यावेळी मोटारीत रोकड मिळून आली. मोटारीतील व्यक्ती व्यावसायिक असल्याचे सांगत असून त्याला त्याच्याकडे असलेल्या रोख रकमेबाबत माहिती देता आली नसल्याने रोकड आणि मोटार जप्त करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर विभागाला घटनास्थळी पाचारण केले.
त्यांच्याकडे रोकड जमा करण्यात आली तर मोटार ‘ग’ प्रभागातील निवडणूक आचार कक्षाकडे जमा करण्यात आली आहे.
पुढील तपास सुरु आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More-Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी भरला अर्ज

Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड

JM Road Firing Case Pune | पुण्यात बापानेच दिली मुलाला गोळ्या घालण्यासाठी 75 लाखाची सुपारी! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितली हकीकत, धक्कदायक कारण आलं समोर (Video)