३३ दिवस हरियाणाच्या जंगलात राहून पोलिसांनी पकडलेले दरोडेखोर ; ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत

वाकड पोलिसांच्या तपासी पथकाची कामगिरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – कोकणे चौकात भरदिवसा विशेष म्हणजे राज्याचे पोलीस माहसंचालक प्रथमच पुणे दौऱ्यावर असताना दुकानात घुसून, सराफावर गोळीबार करुन तब्बल अडीच किलो सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील दोन दरडोखोराना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तुल जप्त केली आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

एक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीषक आणि दहा कर्मचाऱ्यांनी 33 दिवस हिरयाणा राज्यातील जंगलात राहून ही कामगिरी केली आहे. अटक दरोडेखोरांकडून 750 ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त आर.के. पद्यनाभन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुभाष मोहनलाल बिशनोई (वय २४, रा. मंगाली मोहबत, ता. व जि. हिसार, रा. हरियाणा) व महिपाल दुधाराम जाट (वय २१, रा. बालेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आणखी साथीदार अद्याप फरार आहेत. दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्य वेदांत रेसिडेन्सी, रहाटणी, पुणे) हे गोळीबारात जखमी झाले होते.

सहा मार्च रोजी दुपारी कोकणे चौकातील आकाशगंगा सोसायटीतील पुणेकर सराफावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. दरोडेखोरानी दुकानातून अडीच किलो वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले होते. गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिस, पुणे ग्रामीण पोलिस तसेच स्थानिक पोलिसांचे पथके दरोडेखोरांच्या मागावर होते.

वाकड पोलिसांच्या तपासी पथकाने तांत्रिक गोष्टीच्या अधारे तपास करत धागे गोळा केले. सुमारे साडेनऊ हजार लोकांच्या ‘सीडीआर’ तपासले. दरोडेखोर हरियाणा राज्यातील असल्याचे समजताच हरीयाणाला

गुन्हे विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, फौजदार हरिष माने, सिद्धनाथ बाबर, कर्मचारी शाम बाबा, बापूरसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, मनोज बनसोडे, नितीन ढोरजे, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे रवाना झाले.

हरियाणा राज्यातील हिसारच्या जंगलात 33 राहून दोन दरोदेखोर ताब्यात घेतले. त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलिसांनी कसुन चौकशी करून 23 लाख रूपये किमतीचे 750 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. यातील इतर दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. हे सर्व सराइत असून यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तेथील सरकारने या दरोडेखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षिस जाहिर केले आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश माने, गुन्हे विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, फौजदार हरिष माने, सिद्धनाथ बाबर, कर्मचारी शाम बाबा, बापूरसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, मनोज बनसोडे, नितीन ढोरजे, जावेद पठाण, विजय गंभीरे, दिपक भोसले, मधुकर चव्हाण, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, भैरोबा यादव, दत्तात्रय इंगळे, डी. डी. सणस, विक्रम जगदाळे, विक्रांत चव्हाण, सुरज सुतार, मयुर जाधव, हनुमंत राजगे, सागर सुर्यवंशी, नतून कोंडे, मयूर वाडकर यांनी ही कारवाई केली.