दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक ; २ पिस्टल ३ काडतुसे जप्त

वाकड (पिंपरी-चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन – एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून त्यांच्याकडून २ पिस्टल, ३ जीवंत काडतुसे, कोयता, स्टील रॉड आणि एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी काळेवाडी येथे करण्यात आली.
दुर्गेश बापू शिंदे (वय-३२ रा. वाकड चौक, मुळ रा. श्रीरामपूर), प्रमोद संजय सावने (वय-२९ रा. वाकड), भैय्या उर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय-३२ रा. वाकड), नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय-३२ रा. वाकड), रामकृष्ण सोमनाथ सानप (वय-३० रा. वाकड मुळ रा. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना पाच जणांची टोळी काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावर असलेल्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कार मध्ये दबा धरुन बसलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

दुर्गेश शिंदे यांच्यावर जबरी चोरी आणि घरफोडीचे ९ गुन्हे दाखल आहेत. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ८, वाकड पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. सचिन जानकर याच्यावर गंभीर दुखापत, विनयभंग, दंगा असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. सचिन शिंदे याच्यावर कोथरूड आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. रामकृष्ण सानप याच्यावर भूम आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर प्रमोद सावने याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस उप निरीक्षक हरिश माने, सिद्धनाथ बाबर, तपास पथकाली पोलीस कर्माचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, भैरोबा यादव, विजय गंभीरे, दिपक भोसले, शाम बाब, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, जावेद पठाण, रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

 

You might also like