उच्चभ्रू कुटुंबाकडे खंडणी मागणारे दोन इंजिनियर वाकड पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत असलेल्या उद्योजक कुटुंबीयांना पाच लाख रुपये खंडणीसाठी फोन आला आणि न दिल्यास २१ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्याची धमकी दिली. याची माहिती मिळताच सुरू झाला वाकड पोलिसांचा तपास. वेगवेगळ्या तांत्रीक गोष्टींचा तपास करुन माहिती पोलिसांनी जमा केली. तक्रारदारांना विश्वासात घेऊन खंडणीखोरांना पैसे देण्याची तयारी दर्शविण्यासाठी तयार केले. त्यानुसार वेळोवेळी कारणे सांगून त्यांना पकडण्यास योग्य असणाऱ्या काळेवाडी परिसरात बोलावले. त्या ठिकाणी अगोदरच एक रुग्णवाहिका घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी डॉक्टरच्या वेशात, भाजी विक्रेते, हातगाड्या घेऊन ‘वॉच’ ठेवून होते. संशयित पैसे घेण्यास आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन दोन दिवस, तीन रात्र सुरू असलेल्या प्रकरणाचा छडा लावला अशी माहिती पोलीस आयुक्त आर.के. पद्मानाभन यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिली.
[amazon_link asins=’B005FYNT3G,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’003fe71e-be7c-11e8-91d3-317e74fe81db’]

पोलिसांनी रोहित विनोद यादव (२८, रा. प्रेमनगर, नवी दिल्ली) आणि अभिनव सतीश मिश्रा (२७, रा. लखानो, उत्तरप्रदेश) या दोघांना अटक केली आहे.

वाकड काळेवाडी फाटा येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत असलेल्या व्यापारी कुटुंबातील प्रमुखाला बुधवारी दुपारी फोन आला, त्याने पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच न दिल्यास मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या वडिलांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण, उपनिरीक्षक हरिष माने आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

खंडणीखोर वेगवेगळ्या फोन वरून फोन करून पैशाची मागणी करत होते. पोलिसांनी तक्रारदारास विश्वासात घेऊन, संरक्षण दिले होते. तसेच खंडणीखोरांचा तपास युद्ध पातळीवर सुरू ठेवून त्यांना पैसे देण्यास सहमती दर्शविण्यास सांगितले. त्यानुसार काल रात्री दिल्ली विमानतळ येथून पुन्हा त्यांनी फोन करुन आम्ही पुणे येथे पैसे घ्यायला येत असल्याचे सांगितले. आज सकाळी पुन्हा पुणे विमानतळ येथून त्यांना फोन आला व पैसे घेऊन तिकडे बोलावले. मात्र त्यांना कारण सांगून, विश्वासात घेऊन काळेवाडी परिसरात बोलावले. या ठिकाणी वाकडचे सहा पोलीस अधिकारी, ४० कर्मचारी वेशांतर करुन दबा धरून बसले. काही जण डॉक्टर, रुग्ण, रुग्णवाहिका चालक, फळ, भाजी विक्रीच्या हातगाड्या घेऊन थांबले.

खंडणीखोरांनी पैसे एका इलेक्ट्रिक डीपीच्या मागे ठेवण्यास सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी पैसे ठेवले, दरम्यान दोन तरुण त्या ठिकाणी बराच वेळ घुटमळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याच वेळी एकाचा वॉच करत असताना त्याने संशयाने मागे पाहिले, त्यावेळी पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन चौकशी केली व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले. या दोघांकडे चौकशी केली असता हे दोघे बी टेक इंजिनियर असून एक जण दिल्ली येथे कॉल सेंटर मध्ये काम करत आहे. रोहित हा काही दिवसांपूर्वी वाकड येथे शिक्षण घेत असताना त्याने हे कुटुंब पाहिले होते. ते श्रीमंत असल्याने फेसबुकच्या मदतीने नंबर मिळवला. या परिसराची माहिती असल्याने हे दोघे पैसे घ्यायला वाकडला आले. आणि पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांनी यापूर्वी काही असे प्रकार केले आहेत का, कश्याला पैसे हवे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
[amazon_link asins=’B006RHKER4,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0a6a22be-be7c-11e8-be77-577ee78be258′]
ही कामगीरी पोलीस आयुक्त आर.के. पद्मानाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण, उपनिरीक्षक हरिष माने, सहायक निरीक्षक स्वामी, विरेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक बाबर, कर्मचारी धनराज किरनाळे, दादा पवार, अशोक दुधवणे, बिभीषण कण्हेरकर, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, बापूसाहेब धुमाळ, विक्रांत गायकवाड, मधुकर चव्हाण, प्रमोद कदम, मौहंमदगौस नदाफ, विजय गंभिरे, विक्रम कुदळ, राजेश बारशिंगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, नूतन कोंडे या पथकाने केली.

You might also like