वाकड पोलिसांचा अजब सोहळा…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मनुष्याच्या जीवनात एक महत्वाची जागा निर्माण केलेल्या, मात्र स्वतःच्या गाफीलपणामुळे हरविलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध वाकड पोलिसांनी घेतला. अथक प्रयत्न करून, परराज्यातून तसेच राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन सुमारे १२ लाख रुपये किंमतीचे चोरीला गेलेले तब्बल १०१ मोबाईल फोन जप्त करून आज मोठ्या दिमाखात मूळ मालकांना देण्याच्या (मोबाईल प्रदान सोहळा) कार्यक्रम झाला. तसेच चोरीला गेलेले १६ तोळे सोन्याचे दागिनेही देण्यात आले. यावेळी ज्यांना मोबाईल परत मिळाला त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्वकाही सांगून जात होते.
[amazon_link asins=’B01N4J3WAE,B005FYNT3G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’852abb82-b519-11e8-88b3-15473ce88b11′]

वाकड येथे मूळ मालक तसेच तक्रारदारांना मोबाईल फोन प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी, तक्रारदार नागरिक उपस्थित होते.

वाकड पोलिस ठाण्याच्या तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने यांनी आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. माने आणि त्यांच्या पथकाने सुमारे ४०० ते ५०० जणांकडे तांत्रीक तपास केला. वेगवेगळ्या राज्यात जाऊन मोबाइल जप्त केले.
[amazon_link asins=’B01E6QH5T2,B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8e274cb4-b519-11e8-b35e-6d24c06b1306′]

अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, “पोलिसांसाठी प्रत्येक काम जोखमीचे असते. नागरिक प्रत्येक गोष्टीसाठी पोलिसांना जबाबदार धरतात. परंतु जी बेसिक काळजी घ्यायला हवी ती काळजी नागरिक घेताना दिसत नाहीत. बऱ्याच वेळेला नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे काही अघटित घटना घडतात. बेसिक काळजी घेतल्यास गुन्हे घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सतर्क राहायला हवे. जर मोबाईल चोरी, वाहन चोरी सारखे गुन्हे कमी झाले तर पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याच्या अन्य कामांमध्ये लक्ष घालता येईल. वाकड पोलिसांनी जे काम केलं आहे, ते उल्लेखनीय आहे. अशाच प्रकारचे काम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अन्य पोलीस ठाण्यात करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या, “मोबाईल फोनमध्ये अतिमहत्वाची माहिती सेव्ह करून ठेवली जाते. मोबाईल माणसाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपला मोबाईल फोन चोरीला गेल्यास आपण खूप हताश होतो. तक्रार नोंदविल्यानंतर तो सापडण्यासाठी पोलिसांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. वाकड पोलिसांनी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून देखील मोबाईल फोन हस्तगत तसेच मिळविण्यात आले आहेत. मोबाईल फोन मिळाल्यानंतर सर्वांनी सर्वप्रथम तो फॉरमॅट करावा आणि नंतर वापरावा, अशी सूचना देखील उपायुक्त पाटील यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
[amazon_link asins=’B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94b01ec4-b519-11e8-9aa1-e34e58454c88′]

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, “मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा बहुतांश वेळेला शोध घेतला जात नाही. परंतु वाकड पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना देण्यात आले.”

यावेळी मोबाईल आणि सोन्याचे दागिने परत मिळालेल्या काही नागिरकांशी बोललो, त्यावेळी आम्हाला कधीच वाटले नाही की चोरीला गेलेले मोबाईल परत मिळतील. पोलीस आमच्या मोबाईलचा शोध घेऊन ते आम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने परत करतील. हे पाहून पोलीस यंत्रणा खरच चांगले काम करत आहे. नागिरकांनी म्हणजेच आपण योग्य सहकार्य केल्यास नक्की मदत होईल.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा न्युज

पुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…
https://t.me/policenamanews