वाकड पोलिसांची कामगिरी : दोन सराईत गुन्हेगारांकडून ११ दुचाकी जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – हिंजवडी, भोसरी एमआयडीसी, देहूरोड, तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांकडून पोलिसांनी ११ दुचाकी जप्त केल्या आहेत.

राहुल अंकुश क्षीरसागर (१९, रा. कामशेत) आणि अक्षय दशरथ शिंदे (२०, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्यातील टीम क्रमांक १५आणि टीम क्रमांक १६ वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी डांगे चौकातून थेरगावच्या बाजूला एका दुचाकीवर दोघेजण संशयितरीत्या जाताना दिसले. त्यावरून १५नंबर टीमने १६नंबर टीमला कळवले. १६नंबर टीमने त्यांना थेरगाव येथे पकडले.

त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघेजण वापरत असलेली दुचाकी चोरीची असून तिचा नंबर बदलून ते वापरत असल्याचे समजले. त्यावरून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी शहर परिसरात ११ दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, साहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्‍वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, विकास मडके, पोलीस कर्मचारी अनिल महाजन, रजनीकांत कोळी, सुनील काटे, सेलूकर, सनी गोंधळे, विशाल ओव्हाळ, जावेद मुजावर, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले, विक्रम जगदाळे, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, सुरज सुतार यांच्या पथकाने केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त

लहान मुलांचा कान फुटला तर करा ‘हा’ उपाय

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे