Wakad Police Station | ‘म्युकर मायकोसिस’वरील औषधांचा काळा बाजार करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘म्युकर मायकोसिस’वरील (Mucor mycosis) या साथीच्या आजारावरील इंजेक्शन (Injections for contagious diseases) बाजारात चढ्या दराने विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औषधाचा (drug) काळा बाजार करणाऱ्या आंतरराज्य टोळीला (Inter State Gang) वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अटक (Arrest) केली आहे. यापूर्वी गुंडाविरोधी पथकाने (Anti-gang squad) पाच आरोपींना अटक केली होती. त्यावेळी आरोपींकडून 23 हजार 442 रुपयांचे D Liposomol Amphotericin-B Injection 3 बाटल्या जप्त केल्या होत्या.यानंतर वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) केलेल्या कारवाईत 1 लाख 44 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.(Wakad Police Station Arrests Interstate Gang regarding black market of mucormycosis)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

सोलापूरमधून एकाला अटक (One arrested in Solapur)

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Police Commissioner of Police Krishna Prakash) यांनी दिलेल्या माहितीनुसार.
अँटी फंगल (Anti fungal) या साथीच्या आजारावरील इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करताना 5 जणांना अटक करण्यात आली होती.
यासंदर्भात वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास (Investigation) तरत असताना वाकड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलचा तांत्रिक तपास (Technical investigation) केला.
तांत्रिक तपासावरुन शरणबसवेश्वर सिद्धेश्वर ढमामे Sharanbasveshwar Siddheshwar Dhamame (वय-38 रा. विजापूर रोड, सोलापूर) याचा गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती मिळाली.
वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोलापूर (Solapur) येथून ढमामे याला सापळा रचून अटक केली.

औषधांचा पुरवठा कर्नाटकातून (Drugs supplies through Karnataka)

आरोपी ढमामे याच्याकडे सखोल चौकशी केली.
असता हे इंजेक्शन कर्नाटकमधील (Karnataka) गुलबर्गा Gulbarga येथून मिळत असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी बनावट ग्राहत तयार करुन गुलबर्गा येथे पाठवले.
पोलिसांनी इंजेक्शनची विक्री करणारा राजशेखर कासाप्पा भजंत्री Rajasekhara Kasappa Bhajantri (वय-33 रा. पीएनटी हाउसिंग बोर्ड कॉलनी, दवेता मंदिर शेजारी, गुलबर्गा) याला सापळा रचून ताब्यात घेतले.

1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त (material of 1,44,000 seized)

वाकड पोलिसांनी आरोपी राजशेखर भजंत्री यांच्याकडून 84 हजार रुपये किंमतीचे Liposomal Amphotericin B Injection चे 14 नग आणि 60 हजार रुपये किमतीचे Amphotericin B Liposom for Injection चे 8 नग असा एकूण 1 लाख 44 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी शासकीय रुग्णालयात कामाला (accused works at government hospital)

वाकड पोलिसांनी गुलबर्गा येथून अटक केलेला आरोपी राजशेखर भजंत्री हा गुलबर्गा इन्स्ट्युट ऑफ मेडीकल सायन्स (Gulbarga Institute of Medical Science) या शासकीय रुग्णालयात (government hospital) कोवीड (covid) तसेच म्युकर मायकोसिस विभागात (mucor mycosis Department) नर्सिंग स्टाफ (Nursing staff) आहे.
या प्रकरणात मेडीकल कॉलेजमधील आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास पोलीस करित आहेत.
तसेच सोलापूर येथून अटक केलेल्या आरोपीने सोलापूरमध्ये काही जणांना इंजेक्शनची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ (Deputy Commissioner of Police (Crime) Sudhir Hiremath), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 आनंद भोईटे (Deputy Commissioner of Police Unit-2 Anand Bhoite), गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे 1 संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे 2 सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, वाकड पोलीस ठाण्यातील गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक कादबाने, पोलीस हवालदार जावेद पठाण, पोलीस हवालदार विकास खुटवड, पोलीस शिपाई गोरखनाथ कामडे यांच्या पथकाने केली.

 

Web title :  Wakad Police Station | Interstate gang involved in drug trafficking on mucormycosis

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Palghar Fireworks Factory Blast | डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट, परिसर हादरला (व्हिडीओ)